एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
26 जुलैला 'उरी' चित्रपट मोफत दाखवा : राज्य सरकार
कारगिल विजय दिनानिमित्त 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात येणार आहे. तरुणांमध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्य भावना आणि राष्ट्रभक्ती जागृत करणं हा या निर्णयामागील उद्देश आहे.
![26 जुलैला 'उरी' चित्रपट मोफत दाखवा : राज्य सरकार Free show of Uri-The Surgical Strike film on 26th July in Maharashtra 26 जुलैला 'उरी' चित्रपट मोफत दाखवा : राज्य सरकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/24132806/Uri-The-Surgical-Strike.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा एक शो मोफत दाखवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. राज्यभरातील सर्व सिनेमागृहांमध्ये 26 जुलै रोजी 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
कारगिल विजय दिनानिमित्त 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात येणार आहे. तरुणांमध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्य भावना आणि राष्ट्रभक्ती जागृत करणं हा या निर्णयामागील उद्देश आहे. 26 जुलै रोजी सकाळी दहा वाजता राज्यभरातील सुमारे 450 सिनेमागृहांमध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी चित्रपटाचं मोफत प्रक्षेपण करण्याच्या सूचना संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या आहेत.
'उरी' चित्रपट मोफत दाखवण्याबाबत चित्रपटाचे वितरक, सिनेमगृहाचे मालक, चित्रपट संघटनांना आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे माजी सैनिक आणि सिनेअभिनेत्यांमध्ये मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फुटबॉलचा सामना रंगणार आहे.
कारगिल विजय दिवसाची 20 वर्ष
26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम मिळालं होतं. भारताच्या वीर जवानांनी युद्धभूमीत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. यंदा कारगिल विजय दिवसाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
उरी-द सर्जिकल स्ट्राईक
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आधारित 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील 'हाऊज द जोश' ही घोषणा तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती आणि त्याला हाय सर असं म्हणत सगळ्यांनी दाद दिली. या चित्रपटात विकी कौशलची प्रमुख भूमिका होती. तर आदित्य धरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)