(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर 'या' राज्यांत 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त
The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता हा सिनेमा देशातील अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेशनंतर आता कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्ये हा सिनेमा करमुक्त झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा करमुक्त केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे,"सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिकाधिक प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहवा यासाठी आम्ही हा सिनेमा करमुक्त केला आहे".
Kudos to @vivekagnihotri for #TheKashmirFiles, a blood-curdling, poignant & honest narrative of the exodus of Kashmiri Pandits from their home land.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) March 13, 2022
To lend our support to the movie & encourage our people to watch it, we will make the movie tax-free in Karnataka.
गोव्यातदेखील करमुक्त
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पवार यांनीदेखील 'द कश्मीर फाइल्स'या सिनेमाला पाठिंबा दिला आहे. गोव्यात जास्तीत जास्त स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. तसेच लवकरच हा सिनेमा गोव्यातदेखील करमुक्त करण्यात येणार आहे.
'The Kashmir Files' movie will be declared tax-free in Goa, says former CM & BJP leader Pramod Sawant after watching the film based on the life of Kashmiri Pandits in 1990 in J&K pic.twitter.com/x7ihBAR78v
— ANI (@ANI) March 14, 2022
The gripping tale of pain, struggle, suffering of Kashmiri Hindus needs to be understood by everyone so that we ensure such a history is not repeated.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 13, 2022
I have spoken to the INOX management and the movie will continue to be screened with maximum possible shows. #TheKashmirFiles
संबंधित बातम्या
The Kashmir Files : मध्य प्रदेशात 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी पोलिसांना मिळणार रजा
The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप
IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha