एक्स्प्लोर
Advertisement
'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल
पुणे : सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या तक्रारीनंतर 'सैराट' प्रकरणी राज्यातला पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कासम दस्तगीर शेख या 23 वर्षीय आरोपीचं स्वारगेट परिसरात मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. तो शंभर रुपयात मोबाईल किंवा सीडीवर सैराट सिनेमाच्या पायरेटेड कॉपी तो डाऊनलोड करुन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी पायरसी करताना कासमला रंगेहाथ पकडलं. पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यातला हा पहिलाच गुन्हा आहे.
प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ची कॉपी यू ट्यूबवर लिक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यू ट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली. मंजुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
दरम्यान, हा सिनेमा लिक झाला असला तरी प्रेक्षकांनी ‘सैराट’साठी सिनेमागृहात गर्दी केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या विकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.
29 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं आहे.
संबंधित बातम्या
'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण, नागराज मंजुळेंची पोलिसात धाव
रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने 'सैराट', चार दिवसात 15 कोटी पार
नागराज मंजुळेच्या 'सैराट'बाबात सई ताम्हणकरचं आवाहन !
बॉक्स ऑफिसवर सैराट सुसाट, तीन दिवसात 12 कोटींचा गल्ला
‘सैराट’ने कमाईचे रेकॉर्ड्स तोडल्यानंतर नागराज पहिल्यांदाच बोलला….
VIDEO : ‘झिंगाट’ गाण्यावर द ग्रेट खलीही ‘सैराट’
मराठी 85, इंग्रजी 73, ‘सैराट’मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
अहमदनगर
राजकारण
Advertisement