Fighter : हृतिकच्या 'फायटर'ला 'या' देशांत बंदी, निर्मात्यांना मोठा फटका; ओपनिंग डेला किती कमाई करणार?
Fighter Movie Ban in These Country : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Fighter : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2024) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगला धमाका करेल, असे म्हटले म्हटले जात होते. पण आता काही देशांमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.
'या' देशांमध्ये 'फायटर'वर बंदी
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमध्ये फायटरवर बंदी घालण्यात आली आहे. 'फायटर' या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.
View this post on Instagram
'फायटर' किती कोटींची कमाई करणार? (Fighter Box Office Collection)
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या 'फायटर' या सिनेमाची सिनेप्रेक्षकांना उत्सुकता आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'फायटर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 7 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 28 कोटींची कमाई करू शकतो.
'फायटर' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवेल. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करत आहे. या सिनेमात एरियल अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत.
'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 2024 गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिलीजआधीपासूनच या सिनेमाची चांगलीच चर्चा होती. उत्तम कथानक आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या