एक्स्प्लोर
रमझानमध्ये असे कपडे घालू नको, फातिमाच्या बिकिनीतल्या फोटोवर टीका
मुंबई : 'दंगल' सिनेमात पैलवान गीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री फातिमा शेख सध्या चर्चेत आहे. बिकिनीतल्या फोटोशूटमुळे तिची जोरदार चर्चा सुरु आहे.
मात्र बिकीनीमधील तिचे फोटो काहींना आवडले नाहीत. अनेकांनी तिला रमझानमध्ये असे कपडे न घालण्याचा सल्लाही दिला.
फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले. यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर एका लाकडाच्या खुर्चीवर बसलेली आहे. या फोटोमध्ये फातिमाने बिकिनी घातली आहे.
पण तिने बिकिनी घातलेलं अनेक फॉलोअर्सना आवडलं नाही. मुस्लीम असल्याचा आधार घेत, अशाप्रकारचे फोटो रमझानच्या पाक महिन्यात अपलोड केल्याने तिच्यावर टीका होत आहे. नव्या फोटोशूटमध्ये फातिमा काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. फातिमाने जीक्यू इंडिया मॅग्झिनच्या जून एडिशनसाठी हे फोटोशूट केलं. याआधी फातिमा फेमिना मॅग्झिनच्या फोटोशूटमध्ये नवरीच्या लूकमध्ये दिली होती. ही दंगल गर्ल आता 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात दिसणार असून हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement