Ranveer Singh: रिपोर्टरनं रणवीरला ओळखलंच नाही; ओळख करुन देत अभिनेता म्हणाला, 'सर मी मुंबई येथून...', व्हिडीओ व्हायरल
एफ-1 रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी रणवीर सिंह (Ranveer Singh) अबुधाबीमध्ये गेला होता. या स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीर त्याच्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. भारताबरोबरच परदेशातही रणवीरचे चाहते आहेत. रणवीरसोबत फोटो काढायला तसेच रणवीरचा ऑटोग्राफ घ्यायाला चाहते उत्सुक असतात. एफ-1 रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी अबुधाबीमध्ये गेला होता. या स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रिपोर्टर हा रणवीरची मुलाखत घेताना दिसत आहे.
रिपोर्टरनं चक्क रणवीरलाच ओळखलं नाही
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणवीर हा मार्टिन ब्रुंडल नावाच्या एका रिपोर्टरला मुलाखत देतो. तो रिपोर्टर विचारतो, तू कसा आहेस? यावर रणवीर म्हणतो, मी टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. यावर तो रिपोर्टर म्हणतो, 'प्लिज आम्हाला सांग की तू कोण आहेस?' यावर रणवीर म्हणतो, 'सर, मी बॉलिवूड अभिनेता आहे. मी इथे भारतील मुंबई येथून आलो आहे. मी लोकांचे मनोरंजन करतो.'
पाहा व्हायरल व्हिडीओ:
@RanveerOfficial you have killed it on the grid walk at the Abu Dhabi F1 #f1 #RanveerSingh #DeepikaPadukone #SkyF1 #martinbrundel #Bollywood #AbuDhabiGP pic.twitter.com/erOjPaptoU
— jeetu patel (@JE3TUPATEL) November 20, 2022
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
अनेक नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी रणवीरनं स्वत: बद्दल दिलेल्या माहितीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, दिल से 'जीता है ये बंदा' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'यू रॉकिंग रणवीर'
रणवीरचे आगामी चित्रपट
रणवीर लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सोबतच आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रणवीरच्या पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि गली बॉय या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.