'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये विश्वसुंदरी Manushi Chhillar ची एन्ट्री; टायगर अन् अक्षयसोबत शेअर करणार स्क्रीन
Manushi Chhillar Joins Bade Miyan Chote Miyan : 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमानंतर मानुषी छिल्लर पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Manushi Chhillar Joins Bade Miyan Chote Miyan : 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमात विश्वसुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील हा सर्वात मोठा अॅक्शनपट असणार आहे. जानेवारी 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. वाशू आणि जॅकी भननानी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात मुख्य नायिकेच्या भूमकेत दिसणार आहे. मानुषी छिल्लर याआधीदेखील 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात खिलाडी कुमारसोबत दिसून आली होती. आता पुन्हा एकदा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमाच्या माध्यमातून अक्षयसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज आहे.
View this post on Instagram
'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमाच्या शूटिंगला 15 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. तगडी स्टारकास्ट असल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या























