'या' आहेत भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिज; IMDb नं टॉप-50 वेब सीरिजची यादी केली जाहीर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Jun 2023 06:29 PM
'या' आहेत भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिज; IMDb नं टॉप-50 वेब सीरिजची यादी केली जाहीर
भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी IMDb नं घोषित केली आहे. Read More
पोलीस सुलोचना दीदी यांना सलामी  देत आहेत

सुलोचना दीदी यांचे पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचले आहे. पोलीस सुलोचना दीदी यांना सलामी  देत आहेत. सुलोचना दीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर यांच्या हस्ते अंत्यविधीला सुरुवात झाली आहे.

The Night Manager 2 Trailer : 'द नाईट मॅनेजर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

The Night Manager 2 Trailer : 'द नाईट मॅनेजर' या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन (The Night Manager 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 





New Release On OTT: ओटीटीवर अॅडव्हेंचर आणि थ्रिलरचा तडका; या आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज
New Release On OTT:  या आठवड्यात प्रेक्षकांना अॅडव्हेंचर आणि थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत. Read More
Kollam Sudhi: अभिनेता कोल्लम सुधीचं कार अपघातात निधन; वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्लम सुधीचा (Kollam Sudhi) कार अपघातात मृत्यू झाला आहे. Read More
Anupama : समर आणि डिंपल अडकणार लग्नबंधनात; अनुपमा मायाला देणार सडेतोड उत्तर
Anupama : 'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात अनुपमा मायाला सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. Read More
Shreyas Talpade: जेव्हा कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणाला होता 'पनौती'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये अभिनेत्यानं सांगितला किस्सा
नुकताच खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, श्रेयसनं त्याची एका ऑडिशनमधील आठवण सांगितली. Read More
Neena Gupta: 'वाढदिवसाला शुभेच्छा देण्याऐवजी शोक...'; नीना गुप्ता यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
नीना (Neena Gupta) यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. Read More
Satyaprem Ki Katha Trailer : 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर आऊट; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज
Satyaprem Ki Katha : 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Sulochana: 'दीदींचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावना...'; दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सुलोचना दीदींच्या आठवणींना दिला उजाळा
दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुलोचना दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  Read More
Gufi Paintal : महाभारतात 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी
Gufi Paintal : अभिनेते गुफी पेंटर यांचे यांचे निधन झाले आहे. Read More
Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More
Sulochana Latkar Death : सुलोचना दीदी यांच्या पार्थिव प्रभादेवी येथील निवासस्थानी दाखल

Sulochana Latkar Death : सुलोचना दीदी यांचे पार्थिव प्रभावदेवी येथील निवासस्थानी दाखल झालं आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे येणार आहेत. 

Me Honar Super Star Jallosh Juniors Cha : सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार! पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाविजेत्या
Me Honar Super Star : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिमसोहळा पार पडला असून पुण्याच्या सई आणि शरयू या पर्वाच्या महाविजेत्या ठरल्या आहेत. Read More
Sulochana Latkar : अभिनयाचं विद्यापीठ हरपलं... सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
Sulochana Latkar : सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


Actress Sulochana:  ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana) यांच्या पार्थिवावर उद्या, 5 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park)  येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  


Shark Tank India 3 : 'शार्क टँक इंडिया 3' लवकरच होणार सुरू 


Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे. 


Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन


Aamir Raza Husain Passed Away : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 


आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain Passed Away) यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. अजमेरमध्ये शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आमिर राज यांनी 'बाहुबली' 'आरआरआर' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.