एक्स्प्लोर

Sulochana: 'दीदींचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावना...'; दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सुलोचना दीदींच्या आठवणींना दिला उजाळा

दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुलोचना दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Sulochana: अभिनेत्री  सुलोचना (Sulochana) दीदी यांनी काल (4 जून) वयाच्या 94 व्या अखेरचा श्वास घेतला. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुलोचना दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

महेश टिळेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं,   'तो फोन कॉल आता कधीच नाही, दरवर्षी न चुकता पाच जूनला माझ्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी येणारा सुलोचना दिदिंचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावनाच मनाला खोलवर दुःख देणारी आहे.अगदी न चुकता 5 जूनला दुपारच्या वेळेत सुलोचना दीदींच्या येणाऱ्या कॉल मध्ये कधीच खंड पडला नाही. त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मराठी तारका टीम बरोबर दीदींच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. वार्धक्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचाली जरी मंदावल्या होत्या तरी त्यांचा आवाज खणखणीत होता आणि जुन्या गोष्टी त्यांना सगळ्या आठवत होत्या. अधून मधून त्यांची मी सदिच्छा भेट घ्यायचो आशिर्वादासाठी वाकून नमस्कार केल्यावर मायेने डोक्यावरून फिरणारा तो हात, त्या हाताचा स्पर्श आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना बळ देणारा असायचा. चित्रपटसष्टीतील माझ्या शून्यापासून सुरू झालेल्या प्रवासाच्या सुलोचना दीदी एक साक्षीदार होत्या.मराठी तारका कार्यक्रमाच्या पहिल्या शो ला , मराठी तारका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला, माझ्या वन रूम किचन सिनेमाच्या प्रीमियर शो ला ही दीदी आशीर्वाद द्यायला उपस्थित होत्या.सिनेमातून अभिनय करणे त्यांनी बंद केलं होतं तरी माझ्या आग्रहा खातर 2012 मध्ये माझ्या ' लाडी गोडी ' या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं. यात गेस्ट ॲपीरन्स म्हणून भरत जाधवच्या आईची भूमिका केली होती हा त्याचा अखेरचा चित्रपट.'

View this post on Instagram
 
A post shared by Mahesh Tilekar (@maheshtilekar)

पुढे महेश यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'टिव्हीवर माझा एखादा कार्यक्रम ,चित्रपट त्यांनी पाहिला की त्या हमखास फोन करायच्या.2007 मध्ये मराठी तारका हा माझा कार्यक्रम पाहून त्यांनी मला एक भारीतलं घड्याळ भेट म्हणून दिले होते.तेंव्हा फोन करून मी त्यांना सांगितलं " दीदी मी हातात घड्याळ घालतच नाही, तुम्ही कश्याला उगाच खर्च केला" त्यावर " तुम्ही बाहेर कुठं गेलात की प्रेमाने माझ्यासाठी साडी आणता मग माझाही हक्क आहे तुम्हाला भेट द्यायचा असे आपलेपणाने त्यांनी सांगितल्यावर मी एक मौल्यवान नजराणा म्हणून ते घड्याळ जपून ठेवलं आहे पण आता त्यातील वेळ थांबली आहे..भावपूर्ण श्रद्धांजली सुलोचना दीदी'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sulochana: चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget