एक्स्प्लोर

Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चाहतेदेखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'अशी आई होणे नाही', असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर करत सुलोचना दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

राज ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिलं आहे,"सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना..पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा यामुळे. हिंदी सिनेमात 60,70 आणि 80 च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्त्वाचं पात्र असायचं. पण 'आई'पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्र ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या". 

राज ठाकरेंनी पुढे लिहिलं आहे,"सुलोचना दिदींच्यात आईपण हे अंगभूत होतं. त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य. एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो, जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी आई होणे नाही, अशी दीदी होणे नाही. सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली". 

सुलोचना दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी  त्यांच्यावर प्रेम  केले आहे. त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती".

सुलोचना दीदींचा सिनेप्रवास जाणून घ्या...

सुलोचना दीदी यांनी 1946 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. सासुरवास, वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं या गाजलेल्या मराठी सिनेमांत सुलोचना यांनी काम केलं आहे. आजवर त्यांनी 250 हून अधिका मराठी-हिंदी सिनेमांत काम केलं आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 

संबंधित बातम्या

Sulochana Latkar : अभिनयाचं विद्यापीठ हरपलं... सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतोChhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीचा इतिहास,20 वर्षांत अनेक दंगली Special ReportMaharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget