'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत बहुचर्चित छावा चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला आहे. अभिनेता विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून जय भवानीचा जयघोष करत रक्तरंजीत इतिहास 70 मिमि पडद्यावर साकारत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछावा चित्रपटाचा तीन मिनिटांच्या हा ट्रेलरमधील विकी कौशल अन् अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाचा कौतुक होत आहे. रश्मिका मंदाना प्रथमच मराठमोळ्या लूकमध्ये चित्रपटात झकली आहे.
संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळत आहे. रश्मिकाचा मराठमोळा लूक पाहून अनेकांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलंय.
रश्मिकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर छावा चित्रपटाच्या ट्रेलरला काही तासांतच मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले असून तिच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
छावा चित्रपटात अभिनेत्री दिव्या दत्ताने राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे. तर, औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
रश्मिका मंदानाने कपाळावर कुंकू, नऊवारी साडी, नाकाथ नथ परिधान करुन महाराणी येसूबाईंच्या पेहरावात चाहत्यांची मने जिंकली आहेत
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र जिवंत करण्यासाठी विकी कौशलने स्वत:वर खूप मेहनत घेतलेली आहे.
आता, मराठमोळ्या प्रेक्षकांसह सिनेचाहत्यांना या छावा चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे