Telly masala: सिद्धेशनं पूजा सावंतला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज ते मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला रोमान्स; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 31 Dec 2023 06:13 PM
Three Of Us Movie Review: शैलजाच्या आठवणींचा पिटारा; कसा आहे थ्री ऑफ अस? वाचा रिव्ह्यू
Three Of Us Movie Review: थ्री ऑफ अस (Three Of Us)  हा चित्रपट शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत या तिघांच्या अभिनयानं नटलेला चित्रपट आहे. Read More
Telly masala: सिद्धेशनं पूजा सावंतला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज ते मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला रोमान्स; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
VIDEO: फटाक्यांची आतषबाजी अन् रिंग; सिद्धेशनं पूजा सावंतला 'फिल्मी स्टाईल' नं केलं प्रपोज
Pooja Sawant: पूजानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करताना दिसत आहे. Read More
Actor: 16व्या वर्षी नाकारलं, पण 2023 चा ठरला सर्वांत महागडा व्हिलन! बॉबी अन् इमरानला दिली टक्कर
Actor: एका दाक्षिणात्य अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आपल्या डॅशिंग अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा अभिनेता 2023 मधील सर्वांत महागडा व्हिलन ठरला. Read More
Mann Ki Baat: "फिटनेस दोन मिनिटात होणारे नूडल्स किंवा इंस्टंट कॉफी नाहीये";पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये खिलाडी अक्षयच्या फिटनेस टीप्स
Mann Ki Baat: अक्षय कुमारनं (Akshay Kumar) मन की बात या कार्यक्रमामधील ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना फिटनेसच्या काही टीप्स दिल्या आहेत. Read More
VIDEO: "पुन्हा संसार थाटणार" म्हणणाऱ्या मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला खुमेआम रोमान्स!
Malaika Arora: मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये मलायका ही अर्जुनसोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. Read More
Top 20 Songs: 2023 मधील टॉप 20 गाणी ऐकल्याशिवाय या वर्षाचा शेवट होऊच शकत नाही!
Top 20 Songs: तुम्हाला जर थर्टी फर्स्टच्या पार्टीची प्लेलिस्ट तयार करायची असेल तर 2023 या वर्षातील ही टॉप-20 त्यामध्ये अॅड करा- Read More
New Year 2024: थर्टी फर्स्टची रात्र असणार खास; घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
New Year 2024: तुम्ही घरी बसून कुटुंबासोबत थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात तर तुम्हाला घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री तुम्ही छोट्या पडद्यावरील हे कार्यक्रम पाहू शकता.  Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.