Actor: 16व्या वर्षी नाकारलं, पण 2023 चा ठरला सर्वांत महागडा व्हिलन! बॉबी अन् इमरानला दिली टक्कर
Actor: एका दाक्षिणात्य अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आपल्या डॅशिंग अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा अभिनेता 2023 मधील सर्वांत महागडा व्हिलन ठरला.
Vijay Sethupathi: 2023 या वर्षाचा आज शेवटचा दिवस. 2023 मध्ये काही बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांमधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान देखील निर्माण केले. काही कलाकारांनी चित्रपटात खतरनाक व्हिलनची भूमिका साकारली. इमरान हाशमी (Emraan Hashmi) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांसारख्या स्टार्सनी मोठ्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारली. पण या सर्व स्टार्सच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. पण, एका दाक्षिणात्य अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आपल्या डॅशिंग अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. विजय सेतुपती (Vijay Sethupathi) असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. 2023 सालचा सर्वात महागडा खलनायक होण्याचा रेकॉर्ड विजय सेतुपतीनं केला आहे. जाणून घेऊयात विजय सेतुपतीच्या करिअरबद्दल...
16 व्या वर्षी उंचीमुळे मिळाला नकार
विजय सेतुपतीनं अनेक चित्रपटांमध्ये काम करुन चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने रजनीकांत आणि थलपथी विजय यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याला चित्रपटात घेण्यास नाकारले होते. वयाच्या 16 व्या वर्षी, विजय सेतुपतीने नम्मावर चित्रपटासाठी ऑडिशन दिले, पण निर्मात्यांनी त्याला कमी उंचीमुळे नाकारले.
कधी सेल्समन तर कधी अकाउंटंटचं केलं काम
विजय सेतुपती यांनी अभिनय क्षेत्रात येण्याआधी विविध क्षेत्रात काम केलं. त्याने रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनचे काम केले. तसेच त्यानं फास्ट फूडच्या दुकानात कॅशियर म्हणून देखील काम केलं. पैसे कमवण्यासाठी त्याने फोन बूथ ऑपरेटर म्हणूनही काम केले. विजय हा दुबईत अकाउंटंट म्हणून काम करायचा. पण ते काम करुन त्याला आनंद मिळत नव्हता त्यामुळे तो भारतात परत आला.
भारतात परतल्यानंतर, विजय सेतुपती चेन्नई स्थित थिएटर ग्रुप कूथू-पी-पट्टाराईमध्ये अकाउंटंट म्हणून काम करु लागला. त्यावेळी कलाकारांना जवळून अभिनय करताना पाहिले. त्यानंतर त्याने बॅकग्राऊंड अॅक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. विजय सेतुपतीनं थेनमेरकु पारुवाकात्रु या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
'जवान' चित्रपटासाठी मिळाले एवढे मानधन
'मास्टर', 'विक्रम वेधा', 'विक्रम' आणि रजनीकांत याच्या 'पेट्टा' या चित्रपटात विजय सेतुपतीनं खलनायकाची भूमिका साकारली. विजयने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री केला. त्याने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात काम केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तो प्रसिद्ध झाला. या सिनेमासाठी विजय सेतुपतीला 21 कोटी रुपये मानधन मिळाले.
विजय सेतुपती आहे 2023 चा ठरला सर्वांत महागडा व्हिलन!
विजय सेतुपतीला जवान या चित्रपटासाठी जेवढी फी मिळाली तेवढी फी 2023 साली प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटातील खलनायकाला मिळाली नाही. जॉन अब्राहमने 'पठाण' या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये फी घेतली. तर बॉबी देओलला 'अॅनिमल'या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी 4 कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये इमरान हाशमी खलनायक झाला आणि त्याला या चित्रपटासाठी 8 कोटी मानधन मिळाले.
संबंधित बातम्या
सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास