Orry: 'ती अतिशयोक्ती होती' ; ओरीनं फोटो काढण्यासाठी मिळणाऱ्या पैशाबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Nov 2023 04:24 PM
Gururaj Jois Passed Away: 'लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gururaj Jois Passed Away: 27 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुराज जोइस यांचे निधन झाले. गुरुराज यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More
Orry: "ती अतिशयोक्ती होती" ; ओरीनं फोटो काढण्यासाठी मिळणाऱ्या पैशाबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण
Orry:ओरीनं बिग बॉसमध्ये वक्तव्य केलं होतं. याबद्दल वक्तव्याबद्दल ओरीनं सांगितलं. आता या वक्तव्यावर ओरीनं स्पष्टीकरण दिलं आहे. Read More
Orry : ओरी झाला सलमान खानचा 'जबरा फॅन', भाईजान सोबत 'या' चित्रपटात काम करायची इच्छा
Orry : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) सिनेमात काम करण्याची इच्छा ओरीने व्यक्त केली आहे. Read More
War 2 Release Date : हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा
War 2 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यांचा 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. Read More
Animal : रणबीर-रश्मिकाच्या 'ॲनिमल' सिनेमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; इंटीमेट दृश्यांवर आक्षेप
Animal Update : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' रिलीज होण्याआधी सिनेमात काही बदल करण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. Read More
Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांना कशी सून हवी? म्हणाले,"..तर मी महाराष्ट्राला सांगेल दार उघड"
Aadesh Bandekar : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांना कशी सून हवी आहे जाणून घ्या... Read More
Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई गँककडून सलमान खानला पुन्हा धमकी; भाईजानच्या सुरक्षेत वाढ
Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. Read More
Jhimma 2 : 'झिम्मा 2' गाजवतोय बॉक्स ऑफिस; पाच दिवसात केली बक्कळ कमाई
Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. Read More
Rubina Dilaik : रुबिना दिलैक जुळ्या मुलांची आई होणार; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
Rubina Dilaik Twins Babies : अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच जुळ्या मुलांची आई होणार आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. Read More
Randeep Hooda Wedding : अभिनेता रणदीप हुड्डा आज वयाच्या 47 व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात; मणिपूरमध्ये लग्न तर मुंबईत रिसेप्शन
Randeep Hooda Wedding Update : अभिनेता रणदीप हुड्डा आज गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.