Rubina Dilaik : रुबिना दिलैक जुळ्या मुलांची आई होणार; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
Rubina Dilaik Twins Babies : अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच जुळ्या मुलांची आई होणार आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Rubina Dilaik : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) प्रेग्नंट असून लवकरच आई होणार आहे. आता अभिनेत्रीने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत ती जुळ्या मुलांची आई होणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच तिने प्रेग्नंसी जर्नीदेखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
रुबिनाने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीला एक नव्हे तर दोन बाळ होणार आहेत. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आम्हाला जुळी मुलं होणार आहेत. आम्हाला जुळी मुलं होणार असल्याचं जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही काळ आम्ही एकमेकांसोबत बोललोदेखील नाही. असं नाही होऊ शकत असं अभिनव म्हणत होता. पण आता डॉक्टरांनी आम्हाला जुळी मुलं होणार असल्याचं सांगितलं आहे".
View this post on Instagram
रुबिना पुढे म्हणाली,"प्रेग्नंसीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आता आमच्याला डबल सरप्राइज मिळणार आहे. जुळी मुलं होणार हे आता आम्ही स्विकारलं आहे. डॉक्टरांनी सुरुवातीला आम्हाला घाबरवलं होतं. पण आता हे दिवस आम्ही खूप एन्जॉय करत आहोत". रुबिनाने काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट शेअर करत प्रेग्नंट असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.
रुबिनाचा झालेला अपघात
रुबिना तीन महिन्यांची गरोदर असताना तिचा कार अपघात झाला होता. या अपघातानंतर ती खूपच घाबरली होती. तिला आपल्या बाळांची खूप काळजी वाटत होती. रुबिना म्हणते,"प्रेग्नंसीदरम्यान मी जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते". अभिनेत्रीचं मॅटरनिटी फोटोशूटदेखील चांगलच व्हायरल झालं होतं.
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस 14'मुळे (Bigg Boss 14) अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. रुबिना आणि अभिनव लग्नानंतर एकमेकांपासून दूर झाले होते. पण बिग बॉसच्या घरात त्यांना त्यांच्या प्रेमाची पुन्हा जाणीव झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत. लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे.
संबंधित बातम्या