Randeep Hooda Wedding : रणदीप हुड्डा 47 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात; मणिपूरमध्ये लग्न तर मुंबईत रिसेप्शन
Randeep Hooda Wedding Update : अभिनेता रणदीप हुड्डा आज गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकणार आहे.
Randeep Hooda Lin Laishram Wedding : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आज गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकणार आहे. रणदीपच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार असल्याने चाहतेही खूप आनंदी आहेत. मणिपूरध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. तर मुंबईत रिसेप्शन असेल. रणदीप आणि लिनच्या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील.
रणदीप हुड्डा वयाच्या 47 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. मणिपूरमध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर मुंबईत रणदीप-लिनच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. महाभारतात अर्जुनने राजकुमारी चित्रगंधाबरोबर ज्याठिकाणी लग्न केलं त्याच ठिकाणी रणदीप त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सात फेरे घेणार आहे.
View this post on Instagram
रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याला नातेवाईत आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित राहणार आहेत. दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून एकमेकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. 2021 मध्ये त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. लिनच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली होती.
रणदीपची होणारी पत्नी कोण आहे? (Who is Lin Laishram)
रणदीपप्रमाणे लिनदेखील मनोरंजनसृष्टीत अॅक्टिव्ह आहे. लिन मणिपूरमध्ये राहणारी असून ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) 'मेरी कॉम' या सिनेमातही तिने काम केलं आहे. तसेच 'जाने जान', 'रंगून', 'मटरू की बिजली का मंडोली' आणि 'हॅट्रिक' सारख्या सिनेमांत तिने काम केलं आहे.
लिनआधी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करायचा रणदीप
रणदीप हुड्डा आज लिनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. पण लिनआधी तो लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) डेट करत होता. रणदीप आणि सुष्मिता 2004 ते 2006 रिलेशनमध्ये होते. 'कर्मा और होली' या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर सुष्मितानंतर रणदीपचं नाव नीतू चंद्रासोबत जोडलं देलं. 2010 ते 2013 ते रिलेशनमध्ये होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अभिनेत्याचं नाव आदिती राव हैदरीसोबत जोडलं गेलं.
संबंधित बातम्या