War 2 Release Date : हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा
War 2 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यांचा 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
War 2 Release Date Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यांचा 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते उत्सुक आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
'वॉर 2' या सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'वॉर'नंतर चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. आता 'वॉर 2' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. या सिनेमासाठी चाहत्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागणार आहे.
'वॉर 2'ची रिलीज डेट समोर (War 2 Release Date)
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या बहुचर्चित 'वॉर 2' या सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे. वायआरएफ स्पाय यूनिवर्सचा हा सहावा सिनेमा आहे. अयान मुखर्जी (Ayan Mukerj) दिग्दर्शित हा सिनेमा 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.15 ऑगस्टला या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगलं होऊ शकतं.
View this post on Instagram
'वॉर' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 'वॉर' सिनेमातील जबरदस्त अॅक्शन सीन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'वॉर 2'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री?
गेल्या काही दिवसांपूर्वी 'वॉर 2' या बहुचर्चित सिनेमात कियारा आडवाणी झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यशराजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. यशराजने आजव एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाणसारखे ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे.
'वॉर 2' या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमात प्रेक्षकांना हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. 'वॉर'प्रमाणे 'वॉर 2' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.