एक्स्प्लोर

Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी; भाईजानच्या सुरक्षेत वाढ

Salman Khan : लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून धमकी मिळाली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा धमकी दिल्याने भाईजानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y+ सुरक्षा दिली आहे.

फेसबुक पोस्ट शेअर करत सलमानला धमकी

रविवारी बिश्नोईने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक पोस्ट करणारा हा भारताबाहेरील आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं होतं की,"तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता वेळ आली आहे की तुमचा ‘भाऊ’ येऊन तुम्हाला वाचवेल. हा संदेश सलमान खानसाठीही आहे - दाऊद तुम्हाला वाचवेल अशा भ्रमात राहू नका.. तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही".

पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे,"सिद्धू मूसवालाच्या मृत्यूबद्दलच्या तुझ्या नाट्यमय पोस्टने कोणाचं लक्ष वेधून घेतलेलं नाही. तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा ट्रेलर आहे, लवकरच सिनेमा प्रदर्शित होईल. . तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला हा निमंत्रण देण्याची गरज नसते". 

गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने भाईजानला दिलेली जीवे मारण्याची धमकी

सलमानला गेल्या काही दिवसांपूर्वी गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यात लिहिलेलं होतं की, प्रकरण मिटवा, समोरासमोर बोलायचं असेल तर सांगा. वेळीच कळवलं आहे. पुढच्या वेळी झटका बसेल". 

गिप्पी ग्रेवाल म्हणाला,"माझी आणि सलमानची मैत्री नाही. कोणाचा राग कोणावर काढला जात आहे. मौजानाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान सलमान खान भेटला होता. या सिनेमाच्या निर्मात्याने मला ट्रेलर लॉंचला आमंत्रित केलं होतं. त्याआधी बिग बॉसच्या सेटवर तो भेटला होता. माझे कोणाशीही वैर नाही त्यामुळे या प्रकरणात कोणाचा हात असू शकतो याची कल्पनाही करू शकत नाही". 

सलमानच्या 'टायगर 3'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कॅफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Salman Khan : धमकी प्रकरणानंतर सलमानने विदेशातून मागवली बुलेटप्रूफ कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget