Premachi Goshta : अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा विवाह सोहळा विशेष भाग

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Dec 2023 03:25 PM
Telly Masala : उपेंद्र लिमयेचा दमदार प्रवास ते 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala: जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Premachi Goshta : अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा विवाह सोहळा विशेष भाग
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या विवाह सोहळा विशेष भाग पाहायला मिळत आहे. अलिबागच्या कोळीवाड्यात मुक्ता-सागरचं केळवण पार पडलं आहे. Read More
Singham 3 : 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात, अजय देवगनला दुखापत; सिनेमाचं शूटिंगही थांबलं
Singham 3 : अजय देवगन (Ajay Devgn) अभिनीत 'सिंघम 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाच्या सेटवर अपघात झाला असून शूटिंगही थांबवण्यात आलं आहे. Read More
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचं प्रायोगिक रंगभूमीकडे कमबॅक! 'या' नाटकाच्या माध्यमातून पुन्हा गाजवणार रंगभूमी
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांचं 'अरे ला कारे' हे प्रायोगिक नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. Read More
Umang 2023 : शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री ते सलमानच्या 'दबंग' अंदाजाने वेधलं लक्ष; 'उमंग 2023'मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी
Umang Police Show : 'उमंग 2023' या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. Read More
Prabhas : प्रभासच्या चाहत्यांनी मोफत पाहिला 'Salaar'चा फर्स्ट डे फर्स्ट शो! 200 सिनेरसिकांनी उभं राहूनच पाहिला चित्रपट
Salaar Movie : प्रभासचा (Prabhas) 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक चाहत्यांनी हा या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो उभं राहून पाहिला आहे. Read More
Ahan Shetty Break Up : सुनील शेट्टीचा लेक अहानचा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप; 11 वर्षांचं नातं तुटलं
Ahan Shetty Tania Shroff Break Up : अहान शेट्टीचा गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप झाला आहे. 11 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ते नातं संपवलं आहे. Read More
Marathi Movie : मुलगी म्हणजे कुटुंबाची शान! लेक वाचवायची हाक देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; मुक्ता बर्वेच्या 'Y'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
Marathi Movie : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'Y'चा आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. अशातच आता लेक वाचवायची हाक देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Rashid Khan Hospitalised : 'तोरे बिना मोहे चैन नहीं'चे गायक राशिद खान रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
Rashid Khan : लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान यांना कोलकातातील रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Read More
Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'चा जगभरात डंका! दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा
Salaar Movie : प्रभासचा (Prabhas) 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आङे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. Read More
Dunki Box Office Collection : शाहरुखच्या 'डंकी'ची छप्परफाड कमाई! जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Dunki Movie : 'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. 100 कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे. Read More
Upendra Limaye : विनय आपटेंच्या 'त्या' फोनमुळे नेमकं काय घडलं? 'असा' झाला सशक्त अभिनेता उपेंद्र लिमयेचा दमदार प्रवास
Upendra Limaye Majha Katta : विनय आपटेंच्या (Vinay Apte) 'त्या' फोनमुळे उपेंद्र लिमयेला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. माझा कट्ट्यावर त्याने यासंदर्भातला एक किस्सा शेअर केला आहे. Read More
Upendra Limaye : 'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं; उपेंद्र लिमयेने माझा कट्ट्यावर व्यक्त केली खंत
Upendra Limaye Majha Katta : अभिनेता उपेंद्र लिमयेचा एकांकिकांपासून सुरू झालेला प्रवास आज बॉलिवूड ते साऊथपर्यंत पोहोचला आहे. 'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं, अशी खंत अभिनेत्याने माझा कट्ट्यावर व्यक्त केली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.