Udit Narayan Kissing Fan Video Viral : 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. लाईव्ह शोमध्ये उदित नारायण महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर 'टिप-टिप बरसा पानी' गाणं गाताना जमलेल्या चाहत्यांना किस करतानाचा  उदित नारायण यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण एक नव्हे, दोन नव्हे, तर चार महिलांचा किस करताना दिसत आहे. इतकंच नाही, तर एका महिलेला त्यांनी स्मूच केल्याचंही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच उदित नारायण यांच्यावर नेटकरी भडकले आहे.


गायक उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये 4 महिलांना केलं KISS


बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या 69 वर्षांचे आहेत. उदित नारायण यांनी 80 आणि 90 चा बॉलिवूडचा काळ गाजवला आहे. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांचे अनेक लाईव्ह शो पार पडतात. अशाच एका लाईव्ह शोमधील व्हिडीओमुळे उदित नारायण सध्या प्रसिद्धीझोतात आले आहेत. महिला चाहत्यांना किस केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत उदित नारायण यांनी निशाण्यावर धरलं आहे.


महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल


व्हायरल व्हिडीओमध्ये उदित नारायण टिप-टिप बरसा गाणं गाताना दिसत आहे. "मेरे बस में नहीं मेरा मन.." हे गाण्याची बोल गाता-गाता ते पुढे येतात आणि महिला फॅन्सना किस करताना दिसत आहेत. उदित नारायण यांचा एक्स मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उदित नारायण स्टेजवर गाणं गात आहेत आणि चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येत आहेत, त्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही चाहते आहेत, पण उदित स्टेजवरून चालत पुढे येतात. ते महिलांसोबत सेल्फी काढतात आणि त्यानंतर त्यांच्या किस करत आहेत. एका महिला फॅनला त्यांनी ओठांवर किस केलं. 


नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप


उदित नारायण यांच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. काहींनी त्यांना इमरान हाश्मी म्हटलं आहे. अभिनेता केआरके याने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, "हा ठरकी म्हातारा उदित नारायणला पाहा, यावर कुणी कारवाई केली, तर काय होईल?" एका नेटकऱ्याने लिहिलंय, "हा काय प्रकार आहे? आणि महिला या वर्तनाचा विरोध का करत नाहीत". दुसऱ्या युजरने लिहिलंय, "माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही". आणखी एकाने लिहिलंय, "... आणि यांचं वय 69 वर्ष आहे".






महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : 'मेरे बस में नहीं मेरा मन...' गाता-गाता उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये तरुणींना केलं किस, ओठावर KISS करताच भडकले लोक