Upendra Limaye : 'Animal'च्या सीक्वेलमध्येही फ्रेडी पाटील गाजवणार रुपेरी पडदा; 'माझा कट्ट्या'वर अभिनेत्याचा खुलासा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 23 Dec 2023 03:12 PM
Fighter Star Cast Fees : 'फायटर'साठी हृतिकने घेतलंय तगडं मानधन; दीपिका अन् अनिल कपूरच्या फीचा आकडा वाचून बसेल धक्का
Fighter Movie : 'फायटर' हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं आहे. Read More
Upendra Limaye : 'Animal'च्या सीक्वेलमध्येही फ्रेडी पाटील गाजवणार रुपेरी पडदा; 'माझा कट्ट्या'वर अभिनेत्याचा खुलासा
Upendra Limaye : 'अ‍ॅनिमल'च्या (Animal) सीक्वेलमध्येही मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
Vivek Bindra : अरेरे! मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केला मारहाणीचा आरोप; आठवड्याभरापूर्वीच अडकला होता विवाहबंधनात
Vivek Bindra : मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे. Read More
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेवर धावून गेला विकी जैन; नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात सध्या चांगलच नाट्य पाहायला मिळत आहे. विकी जैनने (Vicky Jain) थेट पत्नी अंकिता लोखंडेवर (Ankita Lokhande) हात उचलला आहे. Read More
Mumbai : आता कारागृहात होणार महिला कैद्यांचं मनोरंजन; भायखळा जेलचा विशेष उपक्रम
Mumbai : महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी 'FM रेडीओ सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने विशेष उपक्रम आयोजित केला आहे. Read More
Maharashtra : राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra : राज्य सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवले जाणार आहेत. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. Read More
Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' गाजवतेय छोटा पडदा; टीआरपीच्या शर्यतीत 'प्रेमाची गोष्ट'ने मारली बाजी
Tharla Tar Mag : जुई गडकरीची (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या छोटा पडदा गाजवत आहे. Read More
OTT Release This Week : सनी देओलचा 'गदर 2' ते कंगनाचा 'तेजस'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release : डिसेंबर (December) महिन्याच्या शेवटी अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कलाकृती प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात. Read More
Fighter Song Out : 'फायटर' सिनेमातील 'इश्क जैसा कुछ' गाणं आऊट! हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
Fighter Movie : 'फायटर' या सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'इश्क जैसा कुछ' असे या गाण्याचे नाव आहे. Read More
Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास! 'जवान', 'पठाण' अन् 'Animal'चाही मोडला रेकॉर्ड
Salaar Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Dunki Box Office Collection Day 2 : शाहरुखची जगभर चर्चा! रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी 'डंकी'च्या कमाईत घसरण
Dunki Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' हा सिनेमा जगभरात चांगलीच कमाई करत आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.