Fighter Star Cast Fees : 'फायटर'साठी हृतिकने घेतलंय तगडं मानधन; दीपिका अन् अनिल कपूरच्या फीचा आकडा वाचून बसेल धक्का
Fighter Movie : 'फायटर' हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं आहे.
Fighter Star Cast Fees : 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. सिनेमातील कलाकारांचे पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला असून या टीझरमुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील दोन गाणीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'फायटर' या सिनेमासाठी सर्वच कलाकारांनी चांगलं मानधन घेतलं आहे.
View this post on Instagram
'फायटर'साठी कलाकारांनी घेतलंय तगडं मानधन
(Fighter Star Cast Fees)
हृतिक रोशन (Hrithik Roshan) : 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असून या बहुचर्चित सिनेमासाठी त्याने 50 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) : 'फायटर' या सिनेमात दीपिका पादुकोणचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला आहे. टीझरमधील गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका पादुकोणने या सिनेमासाठी 15 कोटी रुपये चार्ज केले आहेत.
अनिल कपूर (Anil Kapoor) : 'फायटर' या सिनेमात अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी त्यांनी 7 कोटी रुपये चार्ज केले आहेत.
करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) : करण सिंह ग्रोवरने 'फायटर'साठी 2 कोटी रुपये चार्ज केले आहेत. या सिनेमात ते वैमानिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय ओबेरॉय : 'फायटर' या सिनेमात वैमानिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय ओबेरॉयने 1 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
'फायटर' या सिनेमाची निर्मिती 250 कोटी रुपयांत करण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'फायटर' हा भारतातला पहिला एरियल अॅक्शनपट आहे. 'फायटर' हा बिग बजेट सिनेमा आहे. दिवसेंदिवस या सिनेमाबद्दलची चाहत्यांची क्रेझ वाढत चालली आहे. वीएफएक्स शिवाय हा सिनेमा बनवण्यात आला आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. 2024 च्या सुरुवातीला प्रेक्षकांना एक धमाकेदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे.
संबंधित बातम्या