एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra : राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra : राज्य सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवले जाणार आहेत. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे.

Maharashtra : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य (Chhatrapati Shivaji Maharaj) दाखवले जाणार आहे. राज्यात 40 कोटी खर्च करून 36 जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या महानाट्याचा प्रयोग होईल.

त्या त्या जिल्ह्यातल्या नामवंत मंडळींना आमंत्रित करणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दिनांक 2 जून, 2023 ते दिनांक 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या त्या जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्याला बोलावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली, अलौकीक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवणार

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवणार असल्याची घोषणा केली आहे. काही मंडळी याकडे राजकारण म्हणूनदेखील बघतील. पण राज्यसरकारने असं न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 राज्याभिषेकानिमित्त 2 ते 6 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. यासाठी त्यांनी 40 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

शिवाजी महाराजांवरील महानाट्य कोणतं असेल हे अद्याप सरकारने जाहीर केलेलं नाही. जून 2024 च्या आत प्रत्येक जिल्ह्यात या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ आलेल्या असताना राज्यसरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकराचे महानाट्य दाखवले जाणं यावर विरोधक टिका करू शकतात. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील महानाट्य म्हटलं की आकर्षक प्रकाशयोजना, घोडे, बेलगाडे आले. 250 पेक्षा अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि अनेक रोमहर्षक प्रसंग यांचा समावेश होतोच. आता राज्य सरकार कोणतं महानाट्य दाखवणार याची शिवप्रेमी आणि नाट्यप्रेमींना उत्सुकता आहे.

संंबंधित बातम्या

Sindhudurg : ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र! पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget