OTT Release This Week : सनी देओलचा 'गदर 2' ते कंगनाचा 'तेजस'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release : डिसेंबर (December) महिन्याच्या शेवटी अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कलाकृती प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात.
OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. 2023 हे वर्ष ओटीटीसाठी खूपच खास होतं. 2024 मध्येही अनेक चांगले सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. वर्षाचा शेवट अवघ्या काही दिवसांवर आला आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडादेखील मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) पासून ते कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस'पर्यंत (Tejas) अनेक सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
खो गए हम कहां (Kho Gaye Hum Kahan)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 26 डिसेंबर 2023
'खो गए हम कहां' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केलं आहे. डिजिटल युगातील तीन मित्रांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आदर्श गौरव, सिद्धांत चतुवेर्दी आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 26 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
टायगर 3 (Tiger 3)
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
कधी रिलीज होणार? 31 डिसेंबर 2023
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी यांचा 'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा अॅक्शन, थ्रीलर सिनेमा आहे. मनीष शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्रा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
गणपत (Ganpat)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 20 ऑक्टोबर
टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांचा 'गणपत' हा सिनेमा 20 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. अमिताभ बच्चन, कृती सेनन आणि टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
यारियां 2 (Yaariyan 2)
कुठे पाहता येईल? जियो सिनेमा
'यारियां 2' हा रोमँटिक सिनेमा आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमागृहात हा सिनेमा जादू दाखवू शकला नाही.
तेजस (Tejas)
कुठे पाहता येईल? झी 5
कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. रोनी स्क्रूवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
गदर 2 (Gadar 2)
कुठे पाहता येईल? झी 5
सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता हा सिनेमा प्रेक्षकांना झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
द लेडी किलर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'द लेडी किलर' बॉक्स ऑफिसवर आपटलेला सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. आता हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या