Telly Masala : 'जिलबी' चित्रपटात प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी साकारणार भूमिका ते सुबोध भावेनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Sep 2023 05:47 PM
Telly Masala : 'जिलबी' चित्रपटात प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी साकारणार भूमिका ते सुबोध भावेनं केली नव्या चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Prasad Oak: प्रसाद ओकचा 'जिलबी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
प्रसादचा जिलबी (Jilbi) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे. Read More
Kiran Mane: "ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: आलिया आणि रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ओटीटीवर झाला रिलीज; या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट
 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. Read More
Parineeti-Raghav Wedding: लग्नघटिका समीप आली! राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा उदयपूरमध्ये दाखल
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती  आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  Read More
Lalbaugcha Raja Mumbai: अभिनेत्री सनी लिओनीनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; पती डॅनियल वेबरसह बाप्पा चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) शुक्रवार (22 सप्टेंबर) मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं आहे. Read More
Adinath Kothare: "किती वेळा सांगितलं ओ बाप्पा तुम्हाला..."; आदिनाथ कोठारेच्या लेकीचा क्युट अंदाज, व्हिडीओ व्हायरल
Adinath Kothare: नुकताच आदिनाथनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथची मुलगी जीजाचा क्युट अंदाज दिसत आहे.  Read More
Jaane Jaan: 'जाने जान'मध्ये जानच नाही,वाचा रिव्ह्यू
'जाने जान' (Jaane Jaan) हा चित्रपट किगो हिगाशिनो या जपानी लेखकाची रहस्यकथा 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' वर आधारित चित्रपट असल्याने चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता होती. पण चित्रपटाने अपेक्षाभंग केला. Read More
Vijay Antony: "जात, धर्म, पैसा, वेदना..."; लेकीच्या निधनानंतर अभिनेता विजय अँटोनीनं व्यक्त केल्या भावना
लेकीच्या निधनानंतर विजय अँटनीनं (Vijay Antony) भावूक पोस्ट शेअर करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.   Read More
Shubhneet Singh : "इतिहासाच्या प्रत्येक वळणावर पंजाबी लोकांनी..."; 'त्या' पोस्टवर अखेर शुभनीत सिंहनं सोडलं मौन
शुभनीत सिंह (Shubhneet Singh) हा एका पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.आता या वादावर शुभनीतनं मौन सोडलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.