Telly Masala : ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर रिलीज ते अक्षया नाईकचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Sep 2023 05:14 PM
Rio Kapadia Demise: चक दे इंडिया फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षा घेतला अखेरचा श्वास
अभिनेते रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांनी वयाच्या 66 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. Read More
Telly Masala : ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर रिलीज ते अक्षया नाईकचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Akshaya Naik : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईक नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; शेअर केला खास व्हिडीओ
Akshaya Naik : अक्षया नाईक ही एका दोन अंकी नाटकामध्ये काम करणार आहे. एक खास व्हिडीओ शेअर करुन अक्षयानं तिच्या या नव्या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे.  Read More
Teen Adkun Sitaram Trailer: पार्टीनंतर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? रहस्य लवकरच उलगडणार ! ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर रिलीज
Teen Adkun Sitaram Trailer: ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Ira Khan Wedding: आधी कोर्ट मॅरेज, मग राजस्थानमध्ये लग्नसोहळा; मराठमोळ्या फिटनेस ट्रेनरसोबत आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ
Ira Khan Wedding: आयरा ही आधी नुपूरसोबत कोर्ट मॅरेज करणार आहे त्यानंतर नुपूर आणि आयरा यांचा लग्नसोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. Read More
Khupte Tithe Gupte: अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोण प्रभावी उपमुख्यमंत्री? गुप्तेंचा प्रश्न, ताईंचं उत्तर कुणाला खुपणार?
खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत गुप्ते  हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना काही प्रश्न विचारत आहे. Read More
Parineeti Chopra and Raghav Chadha: उदयपूरमध्ये पार पडणार परिणीती आणि राघव यांचा शाही विवाह सोहळा; जाणून घ्या वेडिंग थीम,रिसेप्शन आणि व्हेन्यूबद्दल...
Parineeti Chopra and Raghav Chadha: राजस्थान येथील (Rajasthan) उदयपूरमध्ये (Udaipur) परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. Read More
Gashmeer Mahajani: 'कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं...'; गश्मीर महाजनी शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष
Gashmeer Mahajani: गश्मीरनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More
Jawan Box Office Collection Day 7: शाहरुखच्या 'जवान'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; सात दिवसात केली एवढी कमाई
Jawan Box Office Collection Day 7: 'जवान' चित्रपटानं सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे? जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.