Mitali Mayekar: 'शंभर समस्या...'; मितालीनं शेअर केला खास व्हिडीओ, सिद्धार्थनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Sep 2023 05:24 PM
Telly Masala : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारानं केला भन्नाट डान्स ते मितालीनं शेअर केलेल्या व्हिडीओला सिद्धार्थनं केली खास कमेंट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Mitali Mayekar: 'शंभर समस्या...'; मितालीनं शेअर केला खास व्हिडीओ, सिद्धार्थनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
मितालीनं शेअर केलेल्या व्हिडीओवर  सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Jawan: शाहरुखचा 'जवान' सिनेमा पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी...'
Jawan: नुकतीच एक मराठमोळ्या अभिनेत्यानं जवान या चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Asha Bholse: 'सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका...'; राजकीय नेत्यांनी आशा भोलसे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Asha Bhosle:  राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
Jawan: टक्कल अन् डोळ्यावर गॉगल; शाहरुखसारखा हुबेहुब लूक करुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारानं केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Manoj Jarange: मनोज जरांगेंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?
Manoj Jarange:  मनोज जरांगे यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार का?  या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार? असे प्रश्न अनेकांना पडले होते. Read More
Jailer Actor Death: अभिनेते जी मारीमुथू यांचे निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जी मारीमुथू (G Marimuthu) यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. Read More
Asha Bhosle : आशा भोसलेंचा दोन अटींसह लग्नाचा प्रस्ताव अन् दादा कोंडके 'बाबां'च्या सल्ल्यासाठी थेट कोल्हापुरात; अशा निराशेचा प्रसंग का आला?
'विच्छा'मधून यशाची शिखरे पादाक्रांत करत असतानाच दादा व्यक्तीगत आयुष्यात खोल गर्तेत होते. हा पाठशिवणीचा खेळ सुरु असताना 1967 चा काळ असावा त्यावेळी आशाताई भोसले पहिल्यांदाच दादांच्या आयुष्यात आल्या. Read More
Jawan Review: 'शाहरुख हा सिनेमाचा देव'; 'जवान'चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक, शेअर केली खास पोस्ट
अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट शेअर करुन शाहरुखचं (Shah Rukh Khan) आणि जवान (Jawan) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. Read More
Asha Bhosle: आशा भोसले यांचा 90 वा वाढदिवस; पहिल्या गाण्याचा किस्सा ते कुकिंगची आवड, जाणून घ्या 'मेलोडी क्वीन'बाबत ...
आज आशाताईंच्या  90 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या पहिल्या गाण्याबाबत... Read More
Jawan Box Office Collection Day 1: शाहरुखच्या 'जवान'नं पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केली छप्परफाड कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Jawan Box Office Collection Day 1: 'जवान' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.