एक्स्प्लोर

Asha Bholse: 'सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका...'; राजकीय नेत्यांनी आशा भोसले यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Asha Bhosle:  राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Asha Bhosle:  प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle)  यांचा आज  90 वा  वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज ठाकरे यांनी ट्वीट शेअर करुन आशा भोलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोलसे यांचा फोटो ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या सुमधूर आवाजात विविध भाषांतील हजारो गीतांना अजरामर करणा-या तसेच असंख्य सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ गायिका आदरणीय आशा भोसले जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...'

तसेच राज ठाकरे यांनी देखील एक खास ट्वीट शेअर करुन आशा भोलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस. मागचं शतक अद्वितीय होतं, काय माणसं जन्माला आली त्या शतकांत. प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं इतकी ती चहुबाजुंनी समोर येत होती. त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दीदी आणि आशा ताई. त्यात दीदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकलात तरी क्षणात आत, खोल नेणारा, कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा, घुसळून टाकणारा, खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा.  पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो, पुन्हा मर्त्य जगात आणतो. माणूस म्हणला की प्रेम, वासना, झुगारून देणं, तडफडण हे सगळं आलंच, ह्या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला. म्हणून मी नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, भीमसेन अण्णा, किशोरीताई आमोणकर, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे दैवीस्पर्श लाभलेले, तसंच अनेक गुणी संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार, हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेड लागायची वेळ आली असती. अतिशयोक्ती वाटेल, पण ही माणसं होती, त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं. अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं.   वर म्हणलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता, आता ते सगळं कुठेतरी रितं झाल्यासारखं वाटतंय. पण काळ असाच असतो. हे रितेपण किती, तर आज देखील संगीताचे जे काही शोज टीव्हीवर दिसतात, त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील, ह्याच गायक आणि संगीतकारांची असतात. ह्यावरूनच ह्या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवतं. अर्थात ह्या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी ह्या दोघींना ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलं आहे. जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल, तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल, त्यांचा पिंड आशाताईं सारख्यांच्यामुळेच घडेल ह्याबद्दल शंकाच नाही. आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात, तुम्हाला 'शंभरीपार'ला पर्याय नाही. आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा.'

आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'आपल्या वाट्याला आलेल्या दु:खाला पराभूत करुन कोट्यवधींचे आयुष्य गाण्याने समृद्ध करणाऱ्या ख्यातकीर्त गायिका आशा भोसले... इंद्रधनुच्या सर्व रंगाची छटा गळ्यात असलेल्या आशाताई विषयी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमचे शब्दच तोकडे पडतात... मला पाठच्या भावाचे प्रेम देणाऱ्या आशाताईंना शंभर वर्षाहून अधिक अधिक आयुष्य मिळो..! या देशाच्या "नक्षत्रांचे देणे" सोबत घेऊन जगणाऱ्या आशाताईंना एवढेच सांगणे...(गुलजार साहेबांच्या शब्दात थोडा बदल करुन) मेरा भी कुछ सामान आपके पास पडा है। '

'पद्म विभूषण, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !' असं ट्वीट सुधीर मुनगंटीवार यांनी शेअर केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Asha Bhosle : आशा भोसलेंचा दोन अटींसह लग्नाचा प्रस्ताव अन् दादा कोंडके 'बाबां'च्या सल्ल्यासाठी थेट कोल्हापुरात; अशा निराशेचा प्रसंग का आला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget