Asha Bhosle: आशा भोसले यांचा 90 वा वाढदिवस; पहिल्या गाण्याचा किस्सा ते कुकिंगची आवड, जाणून घ्या 'मेलोडी क्वीन'बाबत ...
आज आशाताईंच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या पहिल्या गाण्याबाबत...
Asha Bhosle: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. 'मेलोडी क्वीन' असंही म्हटलं जातं. विविध जॉनर्सची गाणी आशाताईंनी गायली. आज आशाताईंच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
गायिका आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. एका कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याचा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, "कोल्हापुरात 10 वर्षे वयाची असताना, 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी खूप घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. 1946 साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली."
हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली. परदे में रहने दो, पिया तु अब तो आजा, दम मारो दम, ये मेरा दिल, दिल चीज क्या है या आशा भोसले यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे,एका तळ्यात होती ही आशा भोसले यांची मराठी गाणी लोकप्रिय ठरली.
आशा भोसले या गाण्यासोबतच कुकिंगमध्ये देखील एक्सपर्ट आहेत. त्यांनी बनवलेले कढई गोश्ट आणि बिर्याणी हे पदार्थ अनेकांना आवडतात. दुबई आणि कुवेत येथे आशा यांचे 'आशाज' नावाचे हॉटेल आहे. तसेच आबुधाबी, दोहा, बहरीन येथे देखील आशा भोसले यांचे रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल्समध्ये मिळणारे भारतीय पदार्थ लोक आवडीनं खातात.
View this post on Instagram
आशाताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष स्थानं निर्माण केलं आहे. त्यांची सदाबहार गाणी प्रेक्षक आवडीनं ऐकतात.गेल्या वर्षी आशा भोसले यांना'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
संबंधित बातम्या: