![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jawan: टक्कल अन् डोळ्यावर गॉगल; शाहरुखसारखा हुबेहूब लूक करुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारानं केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Jawan: टक्कल अन् डोळ्यावर गॉगल; शाहरुखसारखा हुबेहूब लूक करुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारानं केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap share video of dance like shah rukh khan in jawan Jawan: टक्कल अन् डोळ्यावर गॉगल; शाहरुखसारखा हुबेहूब लूक करुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारानं केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/08/98569dededa7e7ee8c7ce9e47c5d6ecb1694163478351259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jawan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील शाहरुखच्या विविध लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम कलाकार पृथ्वीक प्रतापनं (Prithvik Pratap) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पृथ्वीकनं शाहरुखच्या जवान या चित्रपटामधील लूकसारखा हुबेहूब लूक केला आहे.
पृथ्वीक प्रतापनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो टक्कल, डोळ्यावर गॉगल आणि लाल कलरचं जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला पृथ्वीकनं कॅप्शन दिलं, 'जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय.'
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
पृथ्वीक प्रतापनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणिअ कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'असं वाटल खरच टाकलू झाला आहेस तू' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'वा दादा!'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
जवान चित्रपटामधील एका सीनमध्ये शाहरुख हा मेट्रोमध्ये 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या डान्स स्टेप्स शाहरुख खानने स्वत: कोरिओग्राफ केल्या आहेत. शाहरुखच्या या डान्सचं कौतुक अनेक जण करत आहेत. आता पृथ्वीक प्रतापनं देखील शाहरुख प्रमाणेच 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील पृथ्वीक प्रतापसोबतच समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात यांनी काम केले.
जवान चित्रपटाची स्टार कास्ट
अॅटलीनं जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धि डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)