Telly Masala : जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत ते एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Sep 2023 05:48 PM
800 Trailer: '800' चा ट्रेलर सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार लाँच; मुंबईमध्ये पार पडणार ट्रेलर लाँच कार्यक्रम
800 Poster: तरण आदर्श यांनी एक ट्वीट शेअर करुन 800 चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाची माहिती दिली आहे. Read More
Telly Masala : जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत ते एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Gashmeer Mahajani : गश्मीर नाव कोणी ठेवले? ते महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावर काय मत आहे? नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची गश्मीर महाजनीनं दिली उत्तरं
Gashmeer Mahajani:  गश्मीरला चाहत्यांनी विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना  गश्मीरनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. Read More
Shah Rukh Khan : 36 गर्लफ्रेंड, 72 एक्स आणि 80 मित्रांसोबत 'Jawan' पाहणार शाहरुखचा चाहता; बुक केलं पूर्ण थिएटर
Jawan : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' या सिनेमाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. Read More
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेची नवी कलाकृती 'लावण्यवती'; चाहते म्हणाले,"दादाचा विषयच वेगळा"
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेची 'लावण्यवती' (Lavanyavati) ही कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Aniket Vishwasrao: 'खोटी आश्वासने आणि दिशाभूल...'; एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव, म्हणाला, 'गेल्या चार दिवसांपासून...'
Aniket Vishwasrao: अनिकेतनं इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दोन एअरलाइन कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.  Read More
Jui Gadkari : शाडूचा गणपती, कापडी फुलांची सजावट, मोदक अन् घरच्याच विहिरीत विसर्जन; जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या जुई गडकरीने बाप्पासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. Read More
Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...'
किरण माने (Kiran Mane) यांनी या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कौतुक केले आहे. Read More
Tejashri Pradhan: सेटवरील जवळची व्यक्ती कोण? सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधाननं दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष
Tejashri Pradhan: नुकतेच प्रेमाची गोष्ट या मालिकेबाबत तेजश्रीला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाची उत्तरं तेजश्रीनं दिली आहेत. Read More
Shah Rukh Khan: 'जवान चित्रपटामधून काय शिकायला मिळणार?' नेटकऱ्याचा किंग खानला सवाल; उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'महिलांचे सक्षमीकरण आणि...'
Jawan Spoiler: एका चाहत्यानं विचालेल्या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. Read More
Shah Rukh Khan : 'गर्लफ्रेंडसोबत 'Jawan' बघायचाय, फ्री तिकीट दे!', बरोजगार बॉयफ्रेंडची शाहरुखकडे मागणी, किंग खान म्हणाला...
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' (Ask Srk) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. Read More
Atisha Naik: मासिक पाळी, हिंदी चित्रपट ते मानधन; वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरुन बोलली अतिशा नाईक
Atisha Naik: एका मुलाखतीमध्ये अतिशानं तिला आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले.  Read More
Gadar 2 Box Office Collection : 'गदर 2'ने पार केला 500 कोटींचा टप्पा; शाहरुखला टक्कर देणार का सनी देओल?
Gadar 2 : सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' या सिनेमाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. Read More
Hemant Dhome On Jalna Maratha Andolan : "राजकारणासाठी हे सारं..."; जालना लाठीचार्ज प्रकरणी अभिनेता हेमंत ढोमे संतापला
Hemant Dhome : जालना लाठीचार्ज प्रकरणी (Jalna Maratha Andolan) अभिनेता हेमंत ढोमेने खास ट्वीट केलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.