Tejashri Pradhan: सेटवरील जवळची व्यक्ती कोण? सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधाननं दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष
Tejashri Pradhan: नुकतेच प्रेमाची गोष्ट या मालिकेबाबत तेजश्रीला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाची उत्तरं तेजश्रीनं दिली आहेत.

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही सध्या 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. तेजश्रीनं या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारली आहे. नुकतेच प्रेमाची गोष्ट या मालिकेबाबत तेजश्रीला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाची उत्तरं तेजश्रीनं दिली आहेत.
आवडता सह अभिनेता किंवा अभिनेत्री?
उत्तर- शुभांगी ताई
सेटवरील आवडता टाईमपास?
उत्तर-जोक सांगणे
मुक्ता आणि तेजश्री या दोघांमधील समानता?
उत्तर-दोघी पॉझिटिव्ह आहेत.
आवडता पदार्थ?
उत्तर-कोळंबीची खिचडी
या गणेशोत्सवाचा प्लॅन काय?
उत्तर-माझ्या सख्ख्या काकाकडे गणपती असतो. तो गोरेगाव येथे राहतो. तिथे आम्ही सगळी भावंड मिळून डेकोरेशन करतो.
सेटवरील जवळची व्यक्ती
उत्तर-माझी आई, शुभांगी ताई, माझे बाबा, योगेश दादा, राज.
डे शिफ्ट की नाईट शिफ्ट?
उत्तर-डे शिफ्ट
इंडोर शूट की आउटडोर शूट?
उत्तर- इंडोर शूट
मेकअप लूक की नो मेकअप लूक?
उत्तर- नो मेकअप लूक
चहा की कॉफी?
उत्तर- दोन्हीही नाही,गरम पाणी
सेटवर कोणाच्या डब्यात चविष्ट जेवण असतं?
उत्तर- शुभांगी ताई
सेटवर उशीरा कोण येतं?
उत्तर- कोणी उशीरा नाही येत. पण ठाण्यातून येणारे अॅक्टर्सला उशीर होतो. कारण घोडबंदर रोडवर खूप प्रोब्लेम सुरु आहेत. ते बिचारे दोन- अडीच तास कारमध्येच प्रवास करतात.
View this post on Instagram
राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम या कलाकारांनी देखील प्रेमाची गोष्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा प्रोमो पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता आणि सागर यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
'होणार सून मी ह्या घरची', 'लेक लाडकी या घरची','प्रेम हे', 'अग्गंबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं. आता तेजश्रीच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
