(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेची नवी कलाकृती 'लावण्यवती'; चाहते म्हणाले,"दादाचा विषयच वेगळा"
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेची 'लावण्यवती' (Lavanyavati) ही कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Avadhoot Gupte New Marathi Song Lavanyavati : मराठी मनोरंजनसृष्टीतील गायक, संगीतकार, सिने-निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. आता त्याची नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अवधूत गुप्तेचे आजवर वेगवेगळ्या गाण्यांचे अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता त्याचा नवा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'लावण्यवती' (Lavanyavati) असे या अल्बमचे नाव आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे," एकविरा म्युझिक तर्फे घेऊन येत आहोत 'लावण्यवती".
अवधूतने पुढे लिहिलं आहे,"पुन्हा एकदा मैफल रंगणार अल्बमची...पुन्हा एकदा लडी सजणार गाण्यांची...एका पाठोपाठ एक अशी येणार चार गाणी..हातात हात गुंफून सांगणार एकच कहाणी.... ढोलकीच्या थापेवर, घुंगरांच्या बोलावर थिरकणार 'लावण्यवती', मग शिट्ट्याही वाजणार... फेटेही उडणार..परंतु, दरवेळेस प्रयत्न होणार काहीतरी नवीन शोधण्याचा..काहीतरी नवीन करण्याचा..म्हणूनच आम्ही म्हणतो की ही 'लावणी' नव्हेच.. हीच तर 'कापणी".
View this post on Instagram
अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर दादाचा विषयच वेगळा, जिंकलस भावा, जबरदस्त, कडक, एक नंबर, महाराष्ट्र माझा..बाई बाई मन मोराचा... अशा पद्धतीच्या अनेक गाण्यांची आता उत्सुकता आहे, एकदम कडक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अवधूतने पोस्ट शेअर करत 'लावण्यवती'ची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये लावणी करणारी नृत्यांगणा भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) असल्याचा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.
अवधूत गुप्तेबद्दल जाणून घ्या...
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गायक, संगीतकार, सिने-निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तो लोकप्रिय आहे. मराठी आणि हिंदीतील अनेक गाण्यांचं त्याने पार्श्वगायन केलं आहे. तसेच अनेक लोकप्रिय संगीत अल्बमला त्यांनी संगीत दिलं आहे. मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अवधूतचं 'ऐका दाजीबा' हा इंडिपॉप अल्बम चांगलाच गाजला. त्यानंतर त्याने 'झेंडा' या सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमाही सुपरहिट झाला.
संबंधित बातम्या