Shyamchi Aai Trailer: बालपणीच्या आठवणी, आईची शिकवण आणि स्वातंत्र्य लढा; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Oct 2023 05:23 PM
Telly Masala : ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ते 'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Kiran Mane: "कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करू दे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: "एकीचे बळ ओळखा" असं किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं आहे. Read More
Shyamchi Aai Trailer: बालपणीच्या आठवणी, आईची शिकवण आणि स्वातंत्र्य लढा; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत
'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये साने गुरुजी यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची शिकवण आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. Read More
Kangana Ranaut: "स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे इतर अवयव देखील आहेत"; भाजप नेत्याला कंगनाचं बेधडक उत्तर
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)  यांनी मात्र ट्वीटच्या माध्यमातून कंगनावर (Kangana Ranaut) टीका केली. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटला कंगनानं सडेतोड उत्तर दिलं आहे.  Read More
Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडित, वनिता खरात आणि ओंकार भोजने यांचा जबरदस्त डान्स; 'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला
‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधील ‘आली आली गं भागाबाई’ हे गाणं रिलीज झालं आहे. Read More
Singham Again: जाळ अन् धूर संगटच; रोहित शेट्टीनं शेअर केले 'सिंघम अगेन' च्या शूटिंगदरम्यानचे फोटो
नुकतेच रोहितनं  सिंघम अगेन (Singham Again)  या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Lalu Prasad Yadav Biopic: लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रकाश झा करणार चित्रपटाची निर्मिती?
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या बायोपिकमध्ये (Lalu Prashad Yadav Biopic) कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  Read More
Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण' मधील दीपिकाच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा; नेटकऱ्यांना रणवीरवर आली दया, म्हणाले, "त्याच्या डोळ्यात वेदना दिसतायत"
Koffee With Karan 8: सोशल मीडियावर कॉफी विथ करण या कार्यक्रमात दीपिकानं (Deepika Padukone) केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. Read More
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकितामध्ये झालं कडाक्याचं भांडण! विकीवर भडकले नेटकरी, म्हणाले...
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात नुकतेच अंकिता आणि विकी यांच्यात भांडण झाले आहे. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
Tejas Review:  कसा आहे कंगनाचा 'तेजस'? वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू
Tejas Review:  कंगनाचा तेजस चित्रपट बघून  कंटाळा येतो आणि लवकर झोप येते. चित्रपटाची एकच चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे हा चित्रपट लवकर संपतो. Read More
Atif Aslam Video: भर कार्यक्रमात चाहत्याने उधळले पैसे; आतिफ अस्लमनं परफॉर्मन्स थांबवला, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
Atif Aslam Video: नुकत्याच एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान आतिफ अस्लमसोबत एक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.