संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसंदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील खासदार दिल्ली दरबारी आहेत. त्यामुळे, देशाचं लक्ष संसदेतील अधिवेशनाकडे लागले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून 10 डिसेंबरपर्यंत संसदेत किती कामकाज झालं आणि खर्चही किती झाला याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया
संसंदेच्या यंदाच्या अधिवेशनात लोकसभेत 18.6 तास (प्रोडक्टिविटी – 28 %) कामकाज झाले आहे. तर, राज्यसभेत 22.5 तास (प्रोडक्टिविटी – 35 %) कामकाज झाले.
संसदेतील एका दिवसाच्या अधिवेशन काळातील खर्च किती असतो, संसद चालविण्यासाठी 1 मनिटाला किती खर्च येतो, याचीही आकडेवारी समोर आली आहे.
अधिवेशन काळातील संसदेच्या कामाकाजासाठी एका मिनिटला 2.5 लाख रुपये खर्च येतो, जो सरकारी तिजोरीतूनच केला जातो. त्यामुळे, संसदेतील वेळ आणि कामकाज किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल
संसदेतील एका मिनिटाचा खर्च लक्षात घेता प्रत्येक तासाला झालेलं नुकसान हे 1.5 कोटी रुपये असून प्रत्येक दिवसाचं नुकसान झाल्यास 9 कोटी खर्च येतो. रुपये
दरम्यान, हिवाळी अधिवेशन काळातील संसदेत आणखी 7 दिवसांचे कामकाज बाकी आहे. 12, 13 डिसेंबर आणि16,17,18,19,20 डिसेंबरपर्यंत कामकाज चालणार आहे.