Telly Masala : ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ते 'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Shyamchi Aai Trailer: बालपणीच्या आठवणी, आईची शिकवण आणि स्वातंत्र्य लढा; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत
Shyamchi Aai Trailer : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये साने गुरुजी यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची शिकवण आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा ट्रेलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडित, वनिता खरात आणि ओंकार भोजने यांचा जबरदस्त डान्स; 'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला
Ekda Yeun Tar Bagha: एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपण बघतो. असंच एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या धमाल चित्रपटातून आपल्या भेटीला आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sankarshan Karhade: "मला आजवर वारीला जाण्याचं भाग्य लाभलं नाही पण..."; ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर संकर्षण कर्हाडेनं शेअर केली भावनिक पोस्ट
Sankarshan Karhade: ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं. नवी मुंबईती नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर अभिनेता संकर्षण कर्हाडेनं (Sankarshan Karhade) एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून संकर्षणनं बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करू दे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. "एकीचे बळ ओळखा" असं किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Malaika Arora: मलायकाचा मराठमोळा अंदाज, "ऐका दाजीबा!" गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ
Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला आहे. या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ही स्टेजवर लाडू वळताना दिसत आहे. तसेच ती "ऐका दाजीबा!" या गाण्यावर डान्स देखील करताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा