Lalu Prasad Yadav Biopic: लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रकाश झा करणार चित्रपटाची निर्मिती?
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या बायोपिकमध्ये (Lalu Prashad Yadav Biopic) कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
Lalu Prasad Yadav Biopic: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे. आता या बायोपिकमध्ये (Lalu Prashad Yadav Biopic) कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय जनता पक्षाने लालू यादव प्रसाद यादव यांच्या बायोपिकची माहिती दिली आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून चित्रपटावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे राइट्स यादव कुटुंबाने घेतले आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे. तेजस्वी प्रसाद या चित्रपटात पैसे गुंतवत असल्याचेही म्हटलं जात आहे. जेव्हा हिंदुस्तान टाईम्सनं प्रकाश झा यांच्याकडे या प्रोजेक्ट संबंधित माहिती विचारण्यात आली, तेव्हा ते हसले. प्रकाश झा यांनी या प्रोजेक्टबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही.
View this post on Instagram
कोण करणार चित्रपाटत काम?
लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकमधील स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्राने सांगितले की, चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार काम करणार आहेत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या बायोपिकचे नाव लालटेन, असेल असंही म्हटलं जात आहे. कारण ते त्यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. पण बायोपिकच्या नावाबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अनेक नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नितीन गडकरी यांचा बायोपिक देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बायोपिकमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.'गडकरी' हा चित्रपट आज (27 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: