(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shyamchi Aai Trailer: बालपणीच्या आठवणी, आईची शिकवण आणि स्वातंत्र्य लढा; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत
'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये साने गुरुजी यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची शिकवण आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
Shyamchi Aai Trailer : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये साने गुरुजी यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची शिकवण आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा ट्रेलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, साने गुरुजींच्या भूमिकेत साकारणारा ओम भूतकर म्हणतो, "माझ्या पुस्तकात आहे एक आश्रम, तिथे या वेड्या-बाकड्या श्यामच्या गोष्टी ऐकायला जमतात आश्रमवासी, असं लिहितोय मी पुस्तकात" त्यानंतर ट्रेलरमध्ये श्यामच्या बालपणीच्या आठवणी दाखवण्यात आल्या आहेत. "प्रत्येकच आई अशी असते का? सोसण्याची ताकद असणारी, पण तडफदार. आपल्या मुलांनी देखील तसंच व्हावं म्हणून तिळ-तिळ तुटणारी" या ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पाहा ट्रेलर:
कधी रिलीज होणार 'श्यामची आई' चित्रपट?
बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . 10 नोव्हेंबर 2023 रोजी 'श्यामची आई' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.'श्यामची आई' या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर, गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.
View this post on Instagram
'श्यामची आई' या चित्रपटातील भूमिकेबाबत ओमनं एबीपी माझासोबत संवाद साधताना सांगितलं, "चॅलेंजिंग भूमिका होती. कारण खूप मोठ्या व्यक्तीमत्वची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला. माझ्याकडून जेवढा प्रयत्न करता आला तेवढा मी केला. भूमिकेचा मी आभ्यास केला आणि दिग्दर्शकानं जसं सांगितलं तसं काम करुन चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. "
इतर महत्वाच्या बातम्या: