Emmy Awards 2022 : एमी पुरस्कार सोहळ्यात झेंडायाचा जलवा; ठरली 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'!
एमी पुरस्कार सोहळ्यात झेंडाया (Zendaya) ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
Emmy Awards 2022 : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards 2022 ) आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री झेंडाया (Zendaya) ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची मानकरी ठरली. झेंडायाला ‘युफोरिया’ या ड्रामा सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एमी पुरस्कार मिळाला. या सीरिजमध्ये झेंडायानं रु बेनेट (Rue Bennett) ही भूमिका साकारली.
झेंडायाला 2020 मध्ये देखील युफोरिया या वेब सीरिजसाठी एमी पुरस्कार मिळाला होता. आता दुसऱ्यांदा झेंडायाला पुन्हा युफोरिया सीरिजमधील अभिनयासाठी एमी पुरस्कार मिळाला आहे. यंदा झेंडायाला एमी पुरस्कार सोहळ्यात चार नामांकनं मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच तिला 'युफोरिया'च्या दुसऱ्या सीझनसाठी executive producer चं नामांकन, 'Elliot's Song' आणि 'आय एम टायर्ड' या गाण्यांसाठी उत्कृष्ट मूळ संगीत आणि गीत यासाठी दोन नामांकनं मिळाली.
2020 मध्ये युफोरिया सीरिजसाठी झेंडायानं एमी पुरस्कार जिंकला त्यावेळी ती अवघ्या 24 वर्षाची होती. झेंडियानं युफोरिया या वेब सीरिजमध्ये 17 वर्षाच्या रु बेनेट या तरुणीची भूमिका साकारली आहे. ही तरुणी ड्रग्सचं सेवन करत असते. या सीरिजमधील झेंडियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
एमीच्या रेड कार्पेटवर झेंडायाचा जलवा
एमी पुरस्कार सोहळ्यासाठी झेंडायानं खास लूक केला होता. तिनं ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊन, सिलव्हर नेकपिस अन् इअरिंग्स असा लूक केला होता. झेंडायाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. इन्स्टाग्रामवर झेंडायानं तिच्या या लूकचा फोटो शेअर केला.
पाहा झेंडियाचा लूक:
View this post on Instagram
एमी पुरस्कार सोहळ्यात (Emmy Awards 2022 ) सर्वोत्कृष्ट टीव्ही शो, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना पुरस्कार दिले जातात. यंदा ‘सक्सेशन’ शोला बेस्ट ड्रामासह सर्वाधिक 25 नामांकने मिळाली आहेत, तर नेटफ्लिक्सने स्ट्रीम केलेले शो Stranger Things, Squid Game आणि Ozark यांचाही नामांकन यादीत समावेश आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :