LSD 2 Movie Bonita Rajpurohit :कधीकाळी 10 हजार रुपयांसाठी करावं लागलं 'हे' काम; आता बॉलिवूडची पहिली लीड ट्रान्सजेंडर अभिनेत्री
LSD 2 Movie Bonita Rajpurohit : बोनिता ही बॉलिवूड आणि कदाचित भारतीय सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर मुख्य अभिनेत्री असणार आहे.
LSD 2 Movie Bonita Rajpurohit : बोनिता राजपुरोहित (Bonita Rajpurohit) 'लव्ह, सेक्स और धोका 2' (Love Sex Aur Dokha 2) या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बोनिता ही ट्रान्सजेंडर अभिनेत्री असून या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये विक्रम रचणार आहे. बोनिता ही बॉलिवूड आणि कदाचित भारतीय सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर मुख्य अभिनेत्री असणार आहे. 'लव्ह, सेक्स और धोका 2' या चित्रपटात बोनिता ही कुलू ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. बोनिताचा इथपर्यंतचा प्रवास हा मात्र प्रचंड कठीण होता.
बोनिताबाबत फारशी माहिती समोर येऊ दिली नव्हती. मात्र, आता 'एलएसडी 2' च्या टीमने तिच्याबाबत आता माहिती दिली आहे. एलएसडी 2 चे निर्मिती करणाऱ्या 'बालाजी मोशन पिक्चर्स'ने याचा एक व्हिडीओ रिलीज केला आहे. बोनिता राजपुरोहित ही मूळची राजस्थानची आहे. मुंबईत आल्यानंतर तिला खूप स्ट्रगल करावा लागला. सुरुवातीच्या काळात तिला फारच कमी पगार मिळत होता. त्यामुळेच नाईलाजाने रात्रीच्या वेळी राहण्यासाठी तिला रेल्वे स्थानकाचा आसरा घ्यावा लागला. मात्र, एके दिवशी तिला लव्ह सेक्स और धोका या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिचे नशीबच बदलले.बोनिता ही एका प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करत होती. त्या ठिकाणी तिला 10 ते 15 हजार रुपये इतका पगार मिळत होता. एवढ्या कमी पगारात दिवस काढणे आव्हानात्मक होते.
अन् स्वप्न पूर्ण झाले....
बोनिताने सांगितले की, जेव्हा चित्रपटात एखादी व्यक्ती पाहायची तेव्हा तिला वाटायचे की ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींना देखील लोकांनी रुपेरी पडद्यावर पाहावे अशी बोनिताची इच्छा आहे. काही स्वप्न असतात ती पूर्ण होतात. आता बॉलिवूडमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. हे देखील माझे एक स्वप्न होते आणि स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद वाटत असल्याचे तिने सांगितले.
View this post on Instagram
बोनिताने सांगितले की, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मी इतर कोणाची व्यक्तीरेखा साकारली नाही. तर स्वत: ट्रिगर पॉईंटला स्पर्श केला. हे खूपच आव्हानात्मक होते असेही तिने सांगितले.
दिबांकर बॅनर्जीचे दिग्दर्शन...
'लव्ह, सेक्स और धोका 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबांकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शन केले आहे. बोनिता राजपुरोहितला संधी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी तिला या चित्रपटासाठी चांगलेच ग्रुम केले. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता.
View this post on Instagram