धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
सत्तेची गुर्मी आहे. दलित कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो. संविधान शिल्प तोडले जाते. ही प्रकरणं कशी हाताळली जात आहेत याकडे महाराष्ट्र बघत आहे.
Vijay Wadettiwar: राज्यात गेलं काही दिवसांपासून परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, बीडचा मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मराठी कुटुंबाला झालेली मारहाण या मुद्द्यांवरून मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्र्यांशी संबंध आहे, त्यामुळे मंत्रीपद असेल तर निष्पक्ष चौकशी होणार नाही, धनंजय मुंडे यांना बाजूला करावे आणि मग चौकशी करावी जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी कशी होणार असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय.
दरम्यान परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा अहवालावरूनही त्यांनी महायुतीला कडाडून टीका केल्याचा दिसलं. लोकांचा जीव जाईपर्यंत मारहाण केली. कितीही म्हणू दे कोंबिंग ऑपरेशन झाले नाही पण ते झाले. काही झालं नाही असं सांगत असले तरी शवविच्छेदनाचा अहवाल समोर आहे. हे सगळे या राज्यात जी नीती आहे दलित आदिवासी कुठेच नसतो. कुणी आवाज केलं तर मारू आणि काही झालं तर पाच दहा लाख देऊ ही सरकारची मानसिकता विकृत आहे. त्यामुळे राहुलजी भेटून सरकारबाबत पोलीस मारहाणी वरून योग्य भूमिका ठरवतील असेही वडेट्टीवार म्हणाले.
सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू
सत्तेची गुर्मी आहे. दलित कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो. संविधान शिल्प तोडले जाते. ही प्रकरणं कशी हाताळली जात आहेत याकडे महाराष्ट्र बघत आहे. बावनकुळे यांना सल्ला आहे बोलताना शब्द जपून वापरावे. सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू असं म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीला चांगलंच सुनावल्याच दिसतय. मराठी माणूस महाराष्ट्राच्या पद्धतीने हल्ले होतात अपमान होतो त्यांच्या जीवांशी मारण्याचे प्रकार होत आहेत. याचे कारण मराठी माणसाचे सरकार नाही. परप्रांतीय विश्वास दुणावला आहे. उद्या त्यांना शहरात वॉर्डातील मराठी माणूस नको वाटेल. सरकारला वाटते परप्रांतीयांमुळे सरकार आले आहे मराठी लोकांना हद्दपार करणार असं म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीवर निशाणा साधला.
भुजबळांनी सत्तेसाठी भूमिका घेऊ नये.. वडेट्टीवार
ओबीसी म्हणून छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणत महायुतीने मत घेतली. तिघांनी वापरली. सत्ता आली आणि बाजूला केले त्यामुळे भुजबळ नवा पर्याय शोधत असतील. ते निर्णय काय घेतात यावर ओबीसी समाज ठरवेल. भुजबळ यांनी जी भूमिका घ्यायची ते पद आणि सत्तेसाठी घेऊ नये ओबीसी चळवळीसाठी घ्यावं तर आम्ही त्यांना साथ देऊ असेही ते म्हणाले. राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्री पदावरून हुतुतू खेळ सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री पण एक वर्षासाठी करा रोटेशन मध्ये करा हे सगळे लुटारू आहेत महाराष्ट्र लुटण्यासाठी बरबाद करण्यासाठी आहेत असं म्हणत वडेट्टीवारांनी पालकमंत्री पदावरून महायुतीला घेरले.