Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
Dhule Crime News : धुळ्यातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून चार बांगलादेशींना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dhule Crime News : शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून चार बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील न्यु शेरे पंजाब लॉजमधील रूम नं.122 मध्ये चार बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या राहत असल्याबाबत गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची टीम परदेशी नागरीकांना ताब्यात घेण्यासाठी न्यू शेरे पंजाब लॉज येथे दाखल झाली.
धुळ्यातील लॉजवर आढळले चार बांगलादेशी नागरिक
याठिकाणी महंमद मेहताब बिलाल शेख (48) शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43, मुळ रा. चरकंदी पो. निलुखी पोलीस ठाणे सिपचर जि.महिदीपुर, बांगलादेश), ब्युटी बेगम पोलस शेख, (45, मुळ रा. बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि.महिदीपुर बांगलादेश) आणि रिपा रफीक शेख (30 वर्ष, मुळ रा. श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर बांगलादेश) हे चार बांगलादेशी नागरिक लॉजवर आढळून आले.
घुसखोरीच्या मार्गाने भारतात केला प्रवेश
पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी महंमद शेख व शिल्पी बेगम हे पती-पत्नी असुन, दोन महिला बहिणी असल्याचे सांगून चारही बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. बेरोजगारीला कंटाळून कोणतेही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केला. त्यानंतर शेर पंजाब येथे राहुन धुळे शहरात कामधंदा आणि घराच्या शोधात हे नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आले नाहीत. ते नातेवाईकांशी बोलण्याकरिता आयएमओ हे अॅप वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या वाचा
High Court: मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का? जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणालं?