Prasad Khandekar: ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर करणार दिग्दर्शन
नुकताच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याच्या चित्रीकरणाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात सुरुवात झाली आहे.
Prasad Khandekar: आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला पहायला मिळणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ अशा शीर्षकाच्या धमाल चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करीत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याच्या चित्रीकरणाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात सुरुवात झाली आहे. गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), भाऊ कदम (Bhalchandra Kadam), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव (Namrata Sambherao), रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत.
‘कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रोडक्शन्स’ आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’ यांच्या वतीने नुकतीच सात मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या प्रसादच्या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली होती. कॅलिडोस्कोप’चे पारितोष पेंटर आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’चे राजेश कुमार मोहंती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
View this post on Instagram
या मुहूर्तप्रसंगी निर्माते परितोष पेंटर, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्यासोबत चित्रपटातील कलाकार आणि ऑनलाइन निर्माते सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप उपस्थित होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेमुळे प्रसाद खांडेकर विशेष लोकप्रियता मिळाली. आता प्रसादनं दिग्दर्शित केलेल्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा सविस्तर बातम्या:
Vikram Vedha: तिसऱ्या दिवशी 'विक्रम वेधा' च्या कमाईत वाढ; बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?