Disha Vakani : 'तारक मेहता का...' मालिकेतील दयाबेन कोट्यवधींची मालकीण; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!
Disha Vakani Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.

TMKOC Dayaben Disha Vakani Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mahta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. यात दयाबेन (Dayaben) म्हणजेच दिशा वकानी (Disha Vakani) आघाडीवर आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दयाबेनला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिने मालिकेतून ब्रेक घेतला असला तरी तिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. दिशाला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. निर्मातेदेखील दयाबेनचं पात्र दुसऱ्या एखाद्या कलाकाराला देण्यापेक्षा दिशाच्या परत येण्याची प्रतीक्षा करत आहेत. दिशी वकानी गेल्या पाच वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.
दिशा वकानी गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दिशाचा समावेश होतो. दिशीची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका भागासाठी दिशा दीड लाख रुपये मानधन घेते.
View this post on Instagram
अभिनेत्री दिशा वकानी 2015 साली मयूर पाडियासोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर अभिनेत्रीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेसह दिशाने 'देवदास', 'मंगल पांडे', 'जोधा अकबर', 'लव्ह स्टोरी 2050' अशा लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
दिशाने सिनेमे, जाहिराती आणि इतर ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगलीच संपत्ती कमावली आहे. तिचे पती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सध्या ती कुटुंबियांसोबत वेळ घातवत आहे. कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
संबंधित बातम्या























