Disha Patani : दिशा पटानीच्या प्रेमात वेडा झाला बॉयफ्रेंड; एलिक्सिकने अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला हातावर
Disha Patani Rumoured Boyfriend Tattoo : दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.
Disha Patani New Boyfriend Aleksander Tattoo : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दिशा आणि टायगरचं (Tiger Shroff) काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं. टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशाच्या आयुष्यात एलेक्जेंडर एलिक्सिक (Aleksander Alexilic) एन्ट्री झाली आहे. आता एलेक्जेंडरने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.
टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा एलेक्जेंडर एलिक्सिकसोबत (Disha Patani New Boyfriend Aleksander Alexilic) अनेकदा स्पॉट झाली आहे. त्यानंतर दिशा आणि एलेक्जेंडर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता एलेक्जेंडरच्या एका कृतीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एलेक्जेंडर एलिक्सिकने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे. या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या टॅटूमुळे एलेक्जेंडर दिशाच्या प्रेमात असल्याचं स्पष्ट होत आहे.
View this post on Instagram
नेटकरी म्हणाले,"टायगर अभी जिंदा है"
दिशा पटानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. "आता टायगरचं काय होणार?, टायगर अभी जिंदा है, टॅटूमध्ये दिशा आदिवासी दिसत आहे, किती ते प्रेम, प्रेमासाठी काहीही, एलेक्जेंडर आणि दिशा रिलेशनमध्ये..व्हा..अभिनंदन, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ काही दिवसांपूर्वी रिलेशनमध्ये होते. पण त्यांनी त्यांचं नातं जाहीर केलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असेच ते सांगत राहिले. पण काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. आता दिशा आणि एलेक्जेंडर एकमेकांना डेट करत आहेत.
दिशा पटानीने 2015 मध्ये 'लोफर' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. आता अभिनेत्रीने दिग्दर्शनात पदार्पण केलं हे. 'क्यों करुं फिकर' या म्यूझिक व्हिडीओचं दिग्दर्शन दिशाने केलं आहे. दिशा लवकरच 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात झळकणार आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअप चर्चांवर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की,"टायगर आणि दिशा दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा मी त्यांना एकत्र पाहिलेलं आहे. मी माझ्या मुलाच्या लव्ह-लाईफकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मला डोकवायचं नाही. पण मला वाटतं टायगर आणि दिशा एकमेकांचे चांगले मित्र आहेत".
संबंधित बातम्या