करियरच्या सुरुवातीलाच शाहरुखसोबत इंटिमेट सीन, अभिनयातून ब्रेक घेत केलं 'या' दिग्दर्शकाशी केलं लग्न, आता काय करते ही अभेनेत्री?
'आघात' चित्रपटात काम केले. 'तमस' चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेला आणि अभिनयाला खूप दाद मिळाली.
Dipa Sahi Birthday: बॉलिवूड विश्वात दीपा साही शाहरुख खानसोबत इंटिमेट सीन देऊन खूप चर्चेत आली. आपल्या कारकीर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट करणारी अभिनेत्री दीपा साही आज ६२वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपानं माया मेमसाब या चित्रपटात शाहरुख खान सोबत इंटिमेट सीन दिले होते. याची मोठी चर्चा तेंव्हा बॉलिवूडमध्ये होती. त्यानंतर अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये दीपा साही दिसली. नंतर दिग्दर्शक केतन मेहताशी लग्न करत तिनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. नंतरही आर या पार, हम अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली. पण नंतर अभिनयापासून ब्रेक घेत तब्बल १८ वर्षांनी आलेल्या मांझी द माउंटन मॅन चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली. जाणून घेऊया दीपा साहीबद्दल काही..
मायानगरीत दाखल झाली..
दीपाचा जन्म 30 नोव्हेंबर 1962 रोजी डेहराडून, उत्तराखंड येथे झाला. ती मेरठमध्ये वाढली, परंतु कालांतरानं तिचे कुटुंबनंतर कॅनडामध्ये गेले. पण दीपा भारतातच राहिली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनएसडीमध्ये दाखल झालेल्या दीपाला अभिनयाच्या ऑफर मिळू लागल्या आणि ही अभिनेत्री बॉलिवूडच्या मायानगरीत दाखल झाली. दीपाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एनएसडीमधून केली. सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीत तिनं प्रसिद्ध लेखक गोविंद निहलानी यांच्यासोबत काम केलं आणि 1984 मध्ये आलेल्या 'पार्टी' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. यानंतर त्यांनी 'आघात' चित्रपटात काम केले. 'तमस' चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेला आणि अभिनयाला खूप दाद मिळाली.
दिग्दर्शकाची लग्न करत निर्मिती क्षेत्रात उतरली.
दीपा साहीनं दिग्दर्शक केतन मेहताशी लग्न करत त्यांच्या अनेक चित्रपटांमधून ती दिसली. हिरो हिरालाल, माया मेमसाब, ओ डार्लिंग ये है इंडिया यासारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. दीपाच्या हम,त्रिनेत्र, एक डॉक्टर की मौत या चित्रपटांचंही खूप कौतूक झालं. नंतर अभिनयापासून ब्रेक घेत १८ वर्षांनंतर इंदिरा गांधींच्या भूमिकेतून दीपा समोर आली.अभिनेत्रीने 2011 मध्ये आलेल्या 'तेरे मेरे फेरे' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
शाहरुखविषयी म्हणाली
माया मेमसाबमध्ये शाहरुखसोबत इंटिमेट सीननंतर या सिनेमाला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी केलेल्या सीनवर दीपा साही शाहरुखविषयी म्हणाली होती, तो सीन करताना मी सुरुवातीला जरा हसत होते. हा चित्रपट रिलिज झाला तेंव्हा ९९ टक्के लोकांना त्यांचं पर्पज मिळाले होतं. पण शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो एक अभिनयाची जाण असलेला सर्वात एनर्जेटीक कलाकार आहे.त्याच्याकडून कित्येक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.