एक्स्प्लोर

Climate Emergency | पर्यावरण आणीबाणीबाबत हुंदके देऊन रडली

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा पर्यावरण आणीबाणीविषयी बोलताना हुंदके देऊन रडू लागली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिया स्टेजवर हुंदके देऊन रडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झा जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये उपस्थित होती. त्यादरम्यान क्लायमेट एमरजन्सी म्हणजेच, पर्यावरण आणीबाणीविषयी बोलताना दिया मिर्झाला स्टेजवरच रडू कोसळलं आणि ती हुंदके देऊन रडू लागली. दिया मिर्झाचा हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिया दिवसागणिक होणाऱ्या पर्यावरणाच्या आणीबाणीविषयी बोलताना रडू लागली. त्यावेळी ती म्हणाली की, कोणचंही दुःख, वेदना समजून घ्या आणि आपल्या अश्रूंना वाट करून द्या.'

दिया मिर्झा पुढे बोलताना म्हणाली की, 'ही गोष्ट समजून घ्या, पूर्णपणे समजून घ्या, हे सुंदर आहे, हीच आपली खरी ताकद आहे. हेच आपण आहोत आणि हा कोणताही परफॉर्मेंस नाही.' तेव्हा दिया मिर्झाला एका व्यक्तीने टिश्यू पेपेर आणून दिले. त्यावर ती म्हणाली की, 'धन्यवाद, मला पेपरची आवश्यकता नाही.' दिया मिर्झाचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिचं कौतुक केलं.

अभिनेत्री दिया मिर्झाचा हा व्हिडीओ अनेक लोक लाईक करत असून त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत. दरम्यान, दिया मिर्झा स्वतः पर्यावरणप्रेमी असून ती अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. एवढचं नाहीतर वाढत्या प्रदूषणाबाबत अभिनेत्री आपले विचार सोशल मीडिया फॅन्ससोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आरे जंगल तोडण्याच्या प्रकरणीही तिने ठाम भूमिका घेत विरोध केला होता. यासंदर्भातील आंदोलनातही ती सहभागी झाली होती.

रविवारी 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील माहिम बीचवर चित्रपट निर्माती प्रज्ञा कपूर यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेला आपलं समर्थन देण्यासाठी दिया मिर्झा, मृणाल ठाकुर, करण वाही आणि मनीष पॉल यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इंटरनेटवर या स्वच्छता मोहीमेचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सेलिब्रिटी स्वच्छता करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी 

आमिरच्या एका शब्दावर खिलाडी अक्षयने बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget