एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमिरच्या एका शब्दावर खिलाडी अक्षयने बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट
आमिर खानचा लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारचा बच्चन पांडे ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होते. मात्र, आमिरच्या एका शब्दावार अक्षयने त्याच्या चित्रपटाची तारीख बदलली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या एका शब्दावर खिलाडी अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. बच्चन पांडे हा चित्रपट आता पुढील वर्षी 22 जानेवारी 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर, आमिरचा बहुचर्चित लाल सिंह चड्ढा ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. आमिर खानने यासंदर्भात ट्विट करत अक्षयकुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचे आभार मानले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आमिर विरुद्ध अक्षय अशी टक्कर आता टळणार आहे.
आमिरचा हा चित्रपट हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सचा चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे. आमिरनेही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. 'लाल सिंह चड्ढा' यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचवेळी अक्षयकुमारचा बच्चन पांडे देखील रिलीज होणार होता. याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसू शकतो. यामुळेच आमिरने अक्षयकुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांना चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली.
"कधीकधी एक संभाषण पुरं असतं. माझा मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचे मी आभार मानतो, की त्यांनी 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट पुढे ढकलली. त्यांच्या चित्रपटासाठी माझ्या शुभेच्छा." असं ट्विट आमिरने केलं आहे. आमिरच्या या ट्विटला रिट्विट करत हो आमिर आपण नेहमीच मित्र आहोत, असं लिहीत अक्षय कुमारने बच्चन पांडे चित्रपटातील नवीन लुकसह नवीन रिलीज डेट दिली आहे.Sometimes all it takes is one conversation. Thank you to my friends @akshaykumar & Sajid Nadiadwala for their warm gesture of moving the release date of their film Bachchan Pandey at my request. I wish them the very best for their film. Looking forward to it. Love. a
— Aamir Khan (@aamir_khan) January 27, 2020
आमिर आणि करिना एकत्र - आमिर आणि करिना ही जोडी या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी ही जोडी 'थ्री इडियट' आणि 'तलाश' चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाईही केली होती. त्यामुळे पुन्हा 'लाल सिंह चड्ढा'मधून आमिर-करिना जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बच्चन पांडे या तारखेला होणार रिलीज - अभिनेता अक्षय कुमारचा मुख्य भूमिका असलेला बच्चन पांडे हा चित्रपट आता 22 जानेवारी 2021 ला प्रदर्शित होणार आहे. याच अभिनेत्री क्रीती सेननही दिसणार आहे. साजिद नाडियावाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून फरहाद सामजी यांनी याचं दिग्ददर्शन केलं आहे. Aamir Khan | कृषी प्रदर्शनातील मुलाखतीत पाणी फाऊंडेशनच्या कामावर आमिर खान काय म्हणाला? | बारामती | ABP MajhaAnytime @aamir_khan , we’re all friends here 🙃 Presenting - new look, new release date. Coming on 22nd January, 2021. In and as #BachchanPandey! #SajidNadiadwala @farhad_samji @kritisanon https://t.co/Y75p0bQmaF pic.twitter.com/orZPR6NZYM
— Akshay Kumar (@akshaykumar) January 27, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement