Dhurandhar Trailer Launch:धुरंधर ' चित्रपटाचा ट्रेलर आला रे..., 4.07 मिनिटांमध्ये इतका थरार अन् ॲक्शन की, चाहत्यांना वेड लावलंय; कधी होतोय रिलीज?
संजय दत्त देखील या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन करताना दिसतोय . आज ट्रेलर लॉन्च च्या कार्यक्रमात संजय दत्त आणि अक्षय खन्ना कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत .

Dhurandhar Trailer Realese: 'उरी ' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' (Dhurandhar Trailer) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ॲक्शन, ड्रामा आणि थ्रिलची दमदार मेजवानी देणारा हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगला फिरत आहे .अर्जुन रामपाल, आर माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंह यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात प्रभावी भूमिकेत दिसत आहेत . रणवीर सिंहचा 'हाफजा उर्फ द रॉक ऑफ गॉड ' हा लूक आणि त्याची ॲक्शन ट्रेलर मध्ये विशेष उठून दिसत आहे . गेल्या अनेक दिवसांपासून धुरंधर या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे . हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रकाशित होणार असल्याचंही सांगितलं जात होतं . दरम्यान, ट्रेलरमध्ये दुसऱ्या भागाविषयी काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही . 'तुम लोगो के फटाके खतम हो गये हो तो मै धमाका शुरू करू ..असं म्हणत धुरंधरचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला .हा सिनेमा 5 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे .
बॉलीवूडच्या चित्रपट सध्या या टप्प्यातून जात आहेत जिथे पडद्यावर सध्या जितका अधिक हिंसाचार, रक्तपात, ॲक्शन तितका तो चित्रपट हिट मानला जातो. त्या सिनेमाची कथा किती दमदार आहे, पात्र किती प्रभावी आहे, यापेक्षाही दमदार ॲक्शन सीन्स आणि वजनदार डायलॉगला मिळालेलं महत्व याला अधिक प्रतिसाद मिळताना दिसतो. धुरंधर सिनेमाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांना उरीपेक्षा ॲनिमल, उरी चित्रपटाची आठवण आल्याशिवाय रहात नाही .
प्रत्येक पात्र एक्शन मोडमध्ये ..
धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक पात्र हे ॲक्शन मोड मध्ये असल्याचे दिसत आहे . चित्रपटात अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना हे व्हिलनच्या भूमिकेत आहेत . अर्जुनची भूमिका ही प्रचंड क्रूर आणि निर्दयी दाखवण्यात आली आहे .तर आजार माधवन हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या प्रेरणेतून तयार केल्याचे म्हटले जात आहे .संजय दत्त देखील या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन करताना दिसतोय . आज ट्रेलर लॉन्च च्या कार्यक्रमात संजय दत्त आणि अक्षय खन्ना कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत .मात्र रणवीर सिंह, अर्जुन रामपाल आणि आर माधवन, नवोदित सारा अर्जुन दिग्दर्शक आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली होती .
अर्जुन रामपालने केलं रणवीर च कौतुक
"रणवीरने या भूमिकेसाठी दोन वर्ष जे केलं त्याचा मला अभिमान आहे .एका फ्रेम मध्ये ही मला रणवीर सिंह दिसला नाही .फक्त हामझा दिसला .आणि ते खूप अप्रतिम होतं . " असं अर्जुन रामपाल रणवीरविषयी म्हणाला . तू पुढे म्हणाला की " द सुपर रॉकस्टार आहे त्याने वेळ मेहनत आणि त्याचं रोजचं आयुष्य यापेक्षा अधिक या सिनेमासाठी दिला आहे .रणवीर हा तुझा आयुष्यातला सर्वात मोठा पेबॅक ठरेल " अशा शुभेच्छा ही अर्जुन रामपालने दिल्या .
कधी रिलीज होतोय धुरंधर ?
धुरंधर हा बहुप्रतिक्षित सिनेमा 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे .या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे .ज्योती देशपांडे आणि लोकेश धर हे सहनिर्माते आहेत .संगीत रेबले त्सुमयोकी आणि शाश्वत सचदेव यांनी दिला आहे .
चाहत्यांची प्रतिक्रिया काय ?
या सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत . दमदार ॲक्शन आणि एनर्जी असणाऱ्या धुरंधरच्या ट्रेलर नंतर एकाच हाताने लिहिले "एनर्जी, मागे असणारा काळोख आणि वातावरण .. शाश्वत ने भारतीय संगीतात एक नवा अध्याय सुरू केलाय "
ज्याप्रकारे धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर बनवलाय त्यावरून एकाच हाताने लिहिलं " मुख्य कथेबद्दल कोणतीही माहिती न देता तुम्ही जो काही हा ट्रेलर बनवता आणि ट्रेलर पाहिल्यानंतर खुर्ची वरून उडी मारायला भाग पाडता याची कमाल आहे ..ट्रेलरच एडिटिंग झकास ..चित्रपट कधी पाहतो असं झालंय ..अशी कमेंट एका चाहत्या ने केली आहे .
























