Dhaakad Trailer: सलमान खानकडून ‘धाकड’च्या ट्रेलरचं कौतुक, कंगना म्हणते ‘आता मी स्वतःला कधीच...’
Dhaakad Trailer: कंगनाचं कौतुक म्हटलं की, तशी बॉलिवूड इंडस्ट्री मागेच असते. पण, आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याने कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या (Dhaakad Trailer) ट्रेलरचे कौतुक केले आहे.
Dhaakad Trailer: बॉलिवूड स्टार्स तिची स्तुती करायला घाबरतात, असे एकदा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली (Kangana Ranaut) होती. कंगनाचं कौतुक म्हटलं की, तशी बॉलिवूड इंडस्ट्री मागेच असते. पण, आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याने कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या (Dhaakad Trailer) ट्रेलरचे कौतुक केले आहे. सलमान खानने कंगना रनौतच्या 'धाकड' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर शेअर केला असून, कंगनाला टॅग करत 'धाकड'च्या टीमचे अभिनंदन केले आहे.
कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित 'धाकड' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कंगनाचे जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स आहेत. चाहते आधीच म्हणत आहेत की, या चित्रपटाची झलक हॉलिवूडच्या चित्रपटांशी मिळती जुळती आहे. कंगनाच्या चित्रपटाचे चाहते कौतुक करत असतानाच, यावेळी बॉलिवूडच्या दबंग खाननेही तिच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमानने कंगनाला देखील या शुभेच्छांच्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. या पोस्टमध्ये सलमानने कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि निर्माता सोहेल मकलाई यांना टॅग केले आहे. सलमानच्या या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाहा पोस्ट :
कंगना म्हणते ‘आता मी स्वतःला कधीच...’
सलमान खानच्या या पोस्टनंतर कंगना रनौतनेही सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचे आभार मानले आहेत. कंगनाने इंस्टा स्टोरीवर लिहिले- 'धन्यवाद माझा दबंग हिरो, तुझे हृदय सोन्यासारखे आहे. आता मी या इंडस्ट्रीत एकटी आहे, असे कधीच म्हणणार नाही. संपूर्ण धाकड टीमच्या वतीने धन्यवाद.’ यासोबतच तिने सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
पाहा फोटो :
कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाला टक्कर देणार आहे. कंगनाचा चित्रपट अॅक्शनपॅक असणार आहे, तर कार्तिकचा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट धुमाकूळ घालणार, यासाठी तो प्रदर्शित होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!